Pitru Paksha Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pitru Paksha 2023: पितृपक्षात 'या' 5 लोकांना देऊ नका त्रास, अन्यथा पितर होतील नाराज

पितृ पक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Pitru Paksha 2023: पितृ पक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी समर्पित पवित्र काळ आहे. या काळात पूर्वजांसाठी विविध उपाय केले जातात. या काळात गरजूंना दान दिल्यास घरात सदैव सुख-समृद्धी राहते. पितृ पक्षात कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ नका कारण हा पितरांचा अपमान मानला जातो. पितृ पक्षा दरम्यान चुकूनही काही विशेष लोकांना त्रास देऊ नका. अन्यथा तुमच्या जीवनात संकटे येऊ शकतात.

गरिब

पितृ पक्षात गरिबांना त्रास दिल्यास पूर्वज तुमच्यावर रागावू शकतात. यामुळे गरिबांना कधीही त्रास देऊ नका. जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर तुमच्या घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे बाहेर पडणे कठीण होते. 

भिकारी

पितृ पक्षात कोणत्याही दिवशी तुम्ही कोणत्याही भिकाऱ्याचा अपमान करू नका. याउलट त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू द्याव्यात. यामुळे तुमच्या घरात नेहमी आनंद टिकून राहतो. शक्य असल्यास भिकाऱ्याला खायला द्यावे. धर्मग्रंथात म्हटले आहे की, भिकाऱ्याच्या रूपातही तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे अस्तित्व जाणवू शकते. त्यामुळे तुम्ही भिकाऱ्याला शक्य तितकी मदत केली पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनात आनंद टिकून राहतो आणि तुम्हाला आर्थिक लाभ होतो. 

मुक प्राणी

पितृ पक्षाच्या काळात कोणत्याही निष्पाप प्राण्याला त्रास देऊ नका. असे मानले जाते की पूर्वज प्राण्यांच्या रूपात तुमच्या आसपास असतात आणि त्यांना त्रास दिल्याने पूर्वज तुमच्यावर नाराज होऊ शकतात. या काळात गाई, कुत्रा सारख्या मुक प्राण्यांना त्रास देऊ नका. यामुळे तुमचे अनेक नुकसान होऊ शकतात. पितृ पक्षामध्ये प्राण्यांना खायला द्यावे.

पाहुणे

तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर पितृपक्षाच्या काळात त्याचा अपमान करू नका. पितृ पक्षाच्या काळात पाहुणे तुमच्या पूर्वजांचे प्रतीक म्हणून येतात आणि त्यांच्याद्वारे पूर्वजांना त्यांच्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात. या दिवसांमध्ये तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर तुम्ही त्याला खायला द्यावे आणि त्याचा पूर्ण आदर करावा. 

वडिलधारी व्यक्ती

पितृ पक्षात तुम्ही घरातील वडीलधारी व्यक्तींना त्रास देत असाल तर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे  मोठ्यांचा आदर केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहतो आणि तुमची राहिलेली कामेही पूर्ण होऊ लागतात. पितृ पक्षाच्या काळात तुम्ही तुमच्या घरातील किंवा घराबाहेर कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये. कारण वडीलधारी व्यक्ती नेहमी तुमच्याबद्दल चांगलेच विचार करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT