Pine Nuts Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pine Nuts For Skin Care: वजन कमी करण्यापासून ते त्वचेवर चमक आणण्यापर्यंत… वाचा पाइन नट्सचे आश्चर्यकारक फायदे

दैनिक गोमन्तक

Pine Nuts: आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अनेकदा आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ड्राय फ्रूट्समध्ये अँटी-ऑक्सिडंट, प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक खनिजे आढळतात.

सहसा लोक त्यांच्या आहारात फक्त काजू, बदाम, मनुका आणि अक्रोडचा समावेश करतात, परंतु तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की पाइन नट्स देखील आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. यांना सामान्य भाषेत चिलगोजा म्हणतात. वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते मेंदूची शक्ती वाढवण्यापर्यंत त्यांचे फायदे दिसून येतात.

तणाव दूर होतो

पाइन नट्समध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. मॅग्नेशियमला ​​मूड मिनरल असेही म्हणतात. मॅग्नेशियम चिंता आणि तणाव दूर करण्यात देखील मदत करतात. याशिवाय झोप आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी देखील हा सुकामेवा उपयुक्त ठरतो.

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक पाइन नट्सला त्यांच्या आहाराचा एक भाग बनवू शकतात. वजन नियंत्रणात आणण्यासाठी हे ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर ठरते. हे खाल्ल्याने भूक लागण्याची इच्छा कमी होऊ लागते. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन नियंत्रणात ठेवता येते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त

अनेकदा मधुमेह असणाऱ्या रुग्णांना अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. परंतु मधुमेहाचे रुग्ण पाइन नट्स खाऊ शकतात. ते जेवणाचा एकूण ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतात, जे मधुमेहासाठी चांगले आहे.

मेंदूच्या आरोग्यासाठी पाइननट्स उपयुक्त

लोह हे मेंदूसाठी चांगले मानले जाते. पाइन नट्समध्ये लोहाचे प्रमाणही जास्त असते. जर पाइन नट्सचे नियमित सेवन केले तर मेंदूचे आरोग्य चांगले राहते आणि शरीराला लोहाचे फायदेही मिळतात.

त्वचेवर चमक येते

अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असल्याने, पाइन नट्स वृद्धत्व कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. हे खाल्ल्याने त्वचेला हानी पोहोचवणारे फ्री रॅडिकल्स कमी होऊ लागतात. यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते आणि त्वचेवर चमकही येऊ लागते.

पाइन नट्स स्नॅक म्हणून खाल्ले जाऊ शकतात, स्मूदी आणि शेकमध्ये घालून आपण त्याचे सेवन करु शकतो. पाइन नट्स जर भाजून खाल्ले तर ते आणखी चविष्ठ लागतात. इतकेच नाही तर हे ड्रायफ्रुट्स दह्यासोबत किंवा फ्रूट चाटमध्ये खाल्ल्यास खूप चवदार लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT