Laptop- Mobile Password Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Password Security: कीबोर्डवर केलेल्या क्लिक्सचा आवाज ऐकूनही चोरला जाऊ शकतो तुमचा पासवर्ड! अशी घ्या काळजी

मोबाइल किंवा लॅपटॉपवर पासवर्ड टाइप करतांना काळजी घेणे गरजेचे आहे कारण किबोर्डच्या आवाजावरून तुमचा पासवर्ड चोरला जाऊ शकताे.

Puja Bonkile

दिवसेंदिवस फसवणूकीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच एक मोठा खुलासा समोर आला आहे. यामध्ये मोबाइल किंवा लॅपटॉप कीबोर्डच्या आवाजतून पासवर्ड चोरला जाऊ शकतो. असे फक्त अॅड्रॉइडच नाही तर आयफोन डिव्हाइसवर देखील होऊ शकते. यामुळे तुमच्या डिवाइसच्या सुरक्षेसाठी पासवर्ड टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे.

ZDnet च्या अहवालानुसार जेव्हा तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर टाइप करता तेव्हा कीबोर्डमधून एक प्रकारचा आवाज येतो. हा आवाज ऐकून हॅकर्स तुमचा पासवर्ड चोरू शकतात. यासाठी एका खास टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे.

  • ही टेक्नॉलॉजी कसे काम करते?

पासवर्ड चोरणाऱ्या या टेक्नॉलॉजीला ध्वनिक साईड चॅनल टेक्नॉलॉजी म्हणतात. यामध्ये हॅकर्स टायपिंग करत असतांना तुमच्या कीबोर्डमधून येणारा आवाज काळजीपूर्वक ऐकतात. नंतर हाच आवाज इनोव्हेटिव्ह टूलवर रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर त्यांचे बारकाईने परीक्षण केले जाते.

यावरून टाइप केलेले अक्षर आणि आकड्यांची माहिती मिळते. यामुळे हॅकर्स तुमच्या डिवाइसमध्ये प्रवेश करू शकतो. या संशोधनात 16 इंच अॅपल मॅकबुक प्रोचा वापर करण्यात आला. यामध्ये एआयच्या मदतीने कीबोर्डचा आवाज ऐकून मॅकबुकमध्ये काय टाइप केले जात आहे हे समजते.

पासवर्ड टाकतांना कोणती काळजी घ्यावी

पासवर्ड तयार करताना कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्सचा वापर करावा.

तसेच पासवर्ड तयार करताना आकड्यांचा किंवा तिन्हांचा वापर करावा.

यामुळे AI ला टायपिंगचा आवाज ओळखता येणार नाही.

तुम्ही जर व्हिडिओ कॉलवर असाल तर तुमच्या मायक्रोफोनजवळ काही बॅगराउंड म्युझिक वापरावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT