Confirm Ticket Booking: भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे वेळोवेळी विशेष गाड्या चालवते. त्याचबरोबर खाण्यापासून ते झोपेपर्यंतचे नियम देखील करण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही उत्सवादरम्यान कन्फर्म तिकिटांबाबतही अनेक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी घरी जायचे असेल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळत नसेल, तर आम्ही अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत,यामुळे तुम्ही सहजपणे कन्फर्म तिकीट बुक करू शकता.
मास्टर लिस्ट फीचरचा वापर करून तिकिट लगेच मिळेल
प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने मास्टर लिस्ट फिचर लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही ठिकाणासाठी कन्फर्म तिकीट बुक करू शकता. कन्फर्म तिकीट बुक करताना प्रवाशांचा माहिती भरण्यात बराच वेळ वाया जात असल्याचे अनेकदा दिसून येते. माहिती सबमिट होईपर्यंत, सर्व तिकिटे बुक होऊन जातात. अशावेळी मास्टर लिस्ट फिचरची तुम्हाला मदत होऊ शकते.
मास्टर लिस्ट फिचरचा कसा वापर करावा
कन्फर्म तिकीट बुक करताना तुम्ही मास्टर लिस्ट फीचरचा वापर करू शकता. तुम्ही ज्या ट्रेनचे बुकिंग करणार आहात, त्याचे तिकिट बुकिंग सुरू होण्यापुर्वी तुमचे नावासह इतर माहिती भरून ठेवावी. यामुळे तुम्ही तिकिट बुकिंग सुरू होताच लगेच पैसे ट्रान्सफर करून कन्फर्म तिकिट करू शकता. ही सुविधा स्लीपरपासून ते एसी डब्यांपर्यंत उपलब्ध आहे.
तत्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी या गोष्टी माहिती असणे गरजेचे
तुम्ही रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करणार असाल तर एसी क्लाससाठी कन्फर्म तिकीट बुक करण्यासाठी सकाळी 10 वाजता तिकिट बुकिंग सुरू होते. तसेच जर तुम्हाला स्लीपर क्लासमध्ये तिकीट काढायचे असेल तर सकाळी 11 वाजल्यापासून बुकिंग सुरू होते. तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन कन्फर्म तिकीट बुक करू शकता.
कन्फर्म तिकीट कसे बुक करावे?
रेल्वेचे तिकीट काउंटर सुरू होण्यापुर्वीच तुम्हाला वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर स्वत: माहिती सबमिट करावी लागेल. आता तत्काल कॅटेगरी सिलेक्ट करावी. तुम्हाला ज्या कोचमध्ये कन्फर्म तिकीट बुक करायचे आहे तो कोच निवडा आणि आता बुक करा वर क्लिक करावे लागेल. यानंतर पेमेंट करावे. तुमचे कन्फर्म केलेले तिकीट बुक होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.