Parenting Tips | Self Dependent  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांना 'Self Dependent' बनवण्यासाठी करा 'हे' 4 कामं

मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पुढिल टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Parenting Tips: सर्व पालकांना त्यांच्या मुलांचे चांगले संगोपन करायचे असते. मुलांनी चांगले वाढावे आणि हुशार व्हावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी ते मुलांना खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवतात.

कधीकधी पालकांचे अतिप्रेम मुलांना बिघडवु शकतात. यामुळे मुलांना संगोपनासोबतच त्यांनी आत्मनिर्भर बनून त्यांना प्रत्येक कमा जबाबदारीने करायला शिकवावे.  यासाठी मुलांना 5 कामे स्वतःहून करण्यास प्रोत्सहान द्यावे. ही कामे कोणती आहेत हे जाणून घेऊया.

शाळेसाठी स्वत: तयार

पालक अनेकदा लहान मुलांना शाळेसाठी तयार करतात. मूलं स्वत: तयार होऊ शकत असले तरी, त्याला स्वतःहून शाळेसाठी तयार होऊ द्यावे. मुलांना शाळेचा ड्रेस, शूज आणि इतर सर्व वस्तूंची स्वच्छता ठेवण्यास सांगावे.

सर्वांसोबत जेवण

घरातील सर्वांसोबत वेळ घालवणे खूप गरजेचे आहे. मुलांनी नेहमी सर्वांसोबत बसून जेवण करावे. जेवताना मुलांना टीव्ही आणि मोबाईलपासून दूर ठेवावे. कुटुंबासोबत बसून जेवण करण्याची ही एक चांगली सवय आहे. हे मुलांना शिकवले पाहिजे. जेवतांना अनेक विषयांवर चर्चा देखील करता येते.

स्वतः ची रूम स्वच्छ करणे

मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना त्यांची रूम स्वतः स्वच्छ करण्याची सवय लावावी. जर मुलाने खेळल्यानंतर इकडे-तिकडे खेळणी पसरवली किंवा खोलीत पुस्तके पसरवली, तर त्यांना रूम स्वच्छ करण्यास सांगावे. यासह मूलं गोष्टी व्यवस्थापित करण्यास शिकेल आणि जबाबदारी समजेल.

कपड्यांची काळजी घेणे

मुलांना स्वत: चे काम स्वत: करायला सांगितले पाहिजे. त्यांना स्वतःचे कपडे ठरवायला सांगावे आणि वॉर्डरोबमध्ये नीट ठेवायला शिकवावे. मुलांना स्वतःच्या कपड्यांची काळजी घ्यायला सांगा. तसेच मुलांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT