Child hypertension Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांमध्ये का वाढतेय उच्च रक्तदाबाची समस्या? पालकांनी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या

Child hypertension: पूर्वी उच्च रक्तदाब ही समस्या प्रामुख्याने प्रौढांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिसून येत असे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ही स्थिती लहान मुलांमध्येही आढळू लागली आहे.

Sameer Amunekar

पूर्वी उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) ही समस्या प्रामुख्याने प्रौढांमध्ये आणि वृद्धांमध्ये दिसून येत असे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ही स्थिती लहान मुलांमध्येही आढळू लागली आहे, जी पालकांसाठी आणि आरोग्य तज्ज्ञांसाठीही चिंतेची बाब आहे. जीवनशैलीतील बदल, आहारातील बिघाड, शारीरिक हालचालींचा अभाव आणि मानसिक ताण हे यामागील प्रमुख घटक मानले जात आहेत.

मुलांमध्ये उच्च रक्तदाब वाढण्याची कारणं

आहार - जंक फूड, पॅकेज्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स यांचे प्रमाण लहान वयातच खूप वाढले आहे. अशा पदार्थांमध्ये मीठ व साखरेचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब वाढवू शकतात.

लठ्ठपणा - जास्त वजन हे उच्च रक्तदाबासाठी एक मोठा जोखीम घटक आहे. हल्ली लहान मुलेही लठ्ठ होऊ लागली आहेत, कारण त्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे.

गेमिंम - टीव्ही, मोबाइल, गेमिंग यामुळे मुले तासन्‌तास जागेवर बसून राहतात. खेळणे किंवा फिरणे कमी झाले आहे. याचा थेट परिणाम शरीराच्या रक्ताभिसरणावर होतो.

मानसिक तणाव - स्पर्धात्मक शिक्षण प्रणाली, पालकांची अपेक्षा, अभ्यासाचा ताण, सोशल मीडियाचा प्रभाव – यामुळे मुलांमध्ये देखील मानसिक तणाव वाढू लागला आहे, जो उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतो.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

1. संतुलित आहार द्या

मुलांच्या आहारात ताज्या फळांचा, भाज्यांचा, संपूर्ण धान्यांचा आणि कमी मीठ/साखर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. बाहेरील खाणं शक्यतो टाळा.

2. नियमित व्यायामाची सवय लावा

दररोज किमान १ तास शारीरिक हालचाल — जसे की सायकल चालवणे, मैदानी खेळ, जलक्रीडा इत्यादी — यासाठी प्रोत्साहन द्या.

3. स्मार्टफोनच टाइम मर्यादित ठेवा

टीव्ही, मोबाईल, टॅब यांचा वापर निश्चित वेळेतच आणि मर्यादित प्रमाणात होईल याची काळजी घ्या.

4. मुलांचे मानसिक आरोग्य जपा

त्यांच्याशी रोज संवाद साधा. त्यांच्या अडचणी, ताण यांच्यावर समजून घेऊन मार्गदर्शन करा. गरज भासल्यास समुपदेशकाचा सल्ला घ्या.

5. नियमित आरोग्य तपासणी

दर ६ महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा डॉक्टरकडून मुलांची आरोग्य तपासणी करून घ्या, ज्यामध्ये रक्तदाबाची मोजणीही समाविष्ट असावी

लक्षणं

उच्च रक्तदाब असलेली लहान मुले खालील लक्षणे दाखवू शकतात:

  • सतत डोकेदुखी

  • चक्कर येणे

  • दृष्टीमध्ये धुंदपणा

  • थकवा आणि चिडचिड

  • नाकातून वारंवार रक्त येणे (कधी कधी)

मुलांमध्ये वाढणारा उच्च रक्तदाब हा भविष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचा इशारा आहे. या समस्येची दखल वेळेवर घेतली, तर अनेक गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. पालकांनी मुलांच्या आहाराकडे, जीवनशैलीकडे आणि मानसिक स्थितीकडे जागरूकतेने लक्ष द्यावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. दैनिक गोमन्तक अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jammu Kashmir: 'बॅगेत तिरंगा होता म्हणून अटक केली'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला 2013 साली जम्मू काश्मीरमध्ये घडलेला प्रसंग

Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

India Test Team: चाहत्यांचा भ्रम ठरला फोल, 'रोहित-विराट' नसतानाही टीम इंडिया सुस्साट…युवा ब्रिगेड जबरदस्त फाॅर्ममध्ये

Women Health: महिलांनो, तुमच्या पोटाचे विकार हलक्यात घेऊ नका! असू शकते 'या' गंभीर आजाराची सुरुवात

Online Fraud: बक्कळ पैसा मिळेल... तो आमिषाला भूलला अन् 2.5 कोटी गमावून बसला; महाराष्ट्रातून एकाला अटक

SCROLL FOR NEXT