Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy: गरोदरपणात 'पॅरासिटामॉल' ठरु शकते घातक! अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Paracetamol Use During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान सामान्यतः वापरले जाणारे 'अ‍ॅसिटामिनोफेन पॅरासिटामॉल' हे औषध सुरक्षित मानले जाते, परंतु एका अभ्यासातून या औषधासंबंधी धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Manish Jadhav

Paracetamol Use In Pregnancy May Increase Adhd Risk Study

गर्भधारणेदरम्यान महिलांना आरोग्यासह आहाराची विशेष काळजी घेण्याचे डॉक्टर वेळोवेळी सांगतात. गर्भधारणेदरम्यान सामान्यतः वापरले जाणारे 'अ‍ॅसिटामिनोफेन पॅरासिटामॉल' हे औषध सुरक्षित मानले जाते, परंतु एका अभ्यासातून या औषधासंबंधी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अ‍ॅसिटामिनोफेन पॅरासिटामॉलचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे. गरोदरपणात पॅरासिटामॉलच्या वापरावर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की त्याचा वापर मुलाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करु शकतो. गर्भवती महिलांनी त्याचे सेवन केल्याने बाळामध्ये ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) चा धोका वाढू शकतो.

पॅरासिटामॉल अ‍ॅसिटामिनोफेन औषध

गरोदरपणात महिलांना (Women) सर्दी, खोकला आणि ताप येतो. यासाठी महिला पॅरासिटामॉल अ‍ॅसिटामिनोफेन औषध घेण्यास सुरुवात करतात. हे औषध पॅरासिटामॉलमध्ये कॉमन आहे. परंतु अभ्यासात असे दिसून आले की, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल औषध हानिकारक असू शकते. याचा मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो.

अभ्यासात काय सांगण्यात आले?

दरम्यान, गर्भवती महिला या औषधाचा वापर जास्त करत असल्याचे अभ्यासातून दिसून आले. मात्र याचा त्यांच्या नवजात बाळावर विपरीत परिणाम होतो. याचा विशेषतः मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. पॅरासिटामॉल औषध घेणाऱ्या महिलांच्या मुलांमध्ये लक्ष न लागणे, वाढलेली हालचाल आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या आढळून आल्या आहेत. ही सर्व लक्षणे अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डरशी संबंधित आहेत, जी एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे.

नवजात मुलाच्या मेंदूवर परिणाम

सोसायटी ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट ऑफ कॅनडा आणि सोसायटी ऑफ मॅटरनल-फेटल मेडिसिन सारख्या एजन्सींनी काही गर्भवती महिलांना या अभ्यासासाठी निवडले. अभ्यासात आढळून आले की, हे औषध घेणाऱ्या महिलांपासून जन्मलेल्या मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम झाला. तज्ञांच्या मते, पॅरासिटामॉलमुळे शरीरात काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे मुलाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.

एडीएचडी म्हणजे काय?

अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर हा एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. यामुळे एकाग्रतेचा अभाव, स्थिरतेचा अभाव, विचार न करता वागणे आणि अतिक्रियाशीलता यासारख्या समस्या निर्माण होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

SCROLL FOR NEXT