Pregnancy: आता गर्भधारणेतील धोके आधीच कळणार! 'ही' ब्लड टेस्ट ठरणार फायदेशीर; संशोधकांचा खुलासा

Pregnancy Complications Blood Test: गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना गर्भधारणेदरम्यान विविध प्रकारच्या कॉम्प्लिकेशनला तोंड द्यावे लागते.
Pregnancy Complications Blood Test
PregnancyDainik Gomantak
Published on
Updated on

New Blood Test Helps Detect Pregnancy Complications Early

गर्भधारणेदरम्यान महिलांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना गर्भधारणेदरम्यान विविध प्रकारच्या कॉम्प्लिकेशनला तोंड द्यावे लागते. परंतु आता शास्त्रज्ञांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांच्या एका पथकाने एक नवीन ब्लड टेस्ट विकसित केली आहे. या टेस्टच्या मदतीने, गर्भधारणेतील कोणतेही कॉम्प्लिकेशन सुरुवातीच्या महिन्यांतच शोधले जातील. अशा परिस्थितीत, गर्भवती महिलेवर वेळेवर उपचार करता येतील आणि आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतील.

ब्लड टेस्ट

क्वीन्सलँड विद्यापीठातील (UQ) संशोधकांनी "नॅनोफ्लॉवर सेन्सर" विकसित केले आहे. ही ब्लड टेस्ट गर्भवती महिलेच्या रक्तातील विशिष्ट बायोमार्कर ओळखते. या टेस्टच्या मदतीने, गर्भधारणेच्या 11व्या आठवड्यात महिलेमध्ये मधुमेह, थायरॉईडचे निदान करता येते. यामुळे या आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवता येते.

Pregnancy Complications Blood Test
Pregnancy: गरोदरपणात महिलांनी रिकाम्या पोटी फळं खावीत का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर

ही ब्लड टेस्ट कशी मदत करेल?

दरम्यान, ब्लड टेस्टच्या मदतीने गर्भवती महिलेची ब्लड टेस्ट गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच 11 आठवड्यांच्या आत केली जाईल. या टेस्टच्या मदतीने गर्भवती महिलेची सहज तपासणी करता येते. शास्त्रज्ञांच्या मते, ब्लड टेस्टच्या मदतीने गर्भवती महिलेमध्ये इतर कोणताही आजार आहे का हे देखील सहज ओळखता येते.

200 महिलांवर रिसर्च

नव्याने विकसित केलेल्या या ब्लड टेस्टने शास्त्रज्ञांनी 200 गर्भवती महिलांमधील कॉम्प्लिकेशन शोधले. रिसर्च करणारे प्रमुख शास्त्रज्ञ गॅलो यांनी सांगितले की, सध्या गरोदरपणातील कॉम्प्लिकेशन शेवटच्या महिन्यांत आढळून येतात, ज्यामुळे वेळेवर उपचार करणे कठीण होते. परंतु या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भवती महिलांना अनेक समस्यांबाबत आधीच मिळू शकेल, ज्यामुळे आधीच डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

Pregnancy Complications Blood Test
Microplastics In Pregnancy: चिंताजनक! गर्भवती महिलांच्या प्लेसेंटामध्ये आढळतयं 'मायक्रोप्लास्टिक्स', नवजात बालकांना धोका; अभ्यासातून खुलासा

गॅलो यांनी पुढे सांगितले की, जर गर्भवती महिलेमध्ये लवकर कॉम्प्लिकेशन आढळले तर बाळाला होणारा धोकाही कमी होईल. तसेच, वेळेवर उपचार मिळाल्यास जन्मानंतर बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करण्याची गरजही भासणार नाही. याशिवाय, आपत्कालीन सिझेरियन प्रसूतींची संख्या देखील कमी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com