Manish Jadhav
गरोदरपणात योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे असते. आहाराचा थेट परिणाम आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर होत असतो.
गरोदरपणात महिलांनी फळे खावी त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्वे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात.
पण काही महिला गरोदरपणात रिकाम्या पोटी फळे खातात. यासाठी फळे खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज (12 फेबुवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गरोदरपणात रिकाम्या पोटी महिलांनी फळे खावीत का? याबद्दल जाणून घेणार आहोत.
गरोदर असताना रिकाम्या पोटी फळे खाणे सुरक्षित असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
जेव्हा तुम्ही सकाळी उठून रिकाम्या पोटी फळे खातात तेव्हा तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. फळे खाल्ल्याने पचन सुलभ होते.
फळे शरीरात डिटॉक्सिफिकेशनचे काम करतात आणि रक्तातील साखर संतुलित ठेवतात. पण आंबट फळे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये. त्यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते.
केळी, सफरचंद आणि पपई ही फळे गरोदरपणात खाणे सुरक्षित मानले जाते. ही सर्व फळे पचायला सोपी असतात आणि स्त्रीच्या शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतात.