Panic Attack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Panic Attack: पॅनिक अटॅक आल्यास काय करावे? वाचा एका क्लिकवर

Panic Attack Treatment: तुम्हाला पॅनिक अटॅक आला तर या 3 गोष्टी लगेच कराव्या. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.

Puja Bonkile

Panic Attack Treatment: आजच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि ऑफिसमधील कामाचा ताण यामुळे अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. अनेक वेळा लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, परंतु चिंता आणि तणावाकडे दुर्लक्ष करू नका.

कारण पुढे ते इतर अनेक मानसिक समस्यांचे कारण बनु शकते. यापैकी एक म्हणजे पॅनीक अटॅक. एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंताग्रस्ततेमुळे पॅनीक अटॅक येऊ शकतो.

हा झटका हृदयविकाराच्या झटक्यासारखा वाटतो आणि अशावेळी रुग्ण स्वतःवरील नियंत्रण गमावून बसतो. पॅनिक अटॅक हे धोकादायक नसले तरी त्याच्यामुळे तुमच्या जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा वेळी काय करावे हे जाणू घेऊया.

व्यायाम

तुम्हाला आधी कधीहू पॅनीक अटॅक आला असेल तर पुन्हा असे होऊ नये यासाठी नियमितपणे व्यायाम करावा. कारण व्यायम केल्याने शारिरिरक हालचाल होते. तसेच मुड सुधारतो आणि मन शांत होते. यामुळे तणाव कमी होऊन पॅनिक अटॅकचा धोका कमी होतो.

दीर्घ श्वास घ्यावा आणि ठोके मोजावे

तुम्हाला पॅनीक अटॅक येत असल्यास, दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू मोजावा. जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर सोप्या उपायांचा वापर करावा. यामुळे तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता आणि श्वास सोडाताना हृदयाचे ठोके मोजावे.

थंडपाणी

थंड पाण्याने आलेला पॅनीक अटॅक कमी करता येतो. जेव्हा अॅटॅक येतो तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा किंवा बर्फाच्या पाण्याचा वापर करावा. चेहऱ्यासह मान पुसून घ्यावी आणि डोक्यावर थंड टॉवेल ठेवावा. यामुळे मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

तणाव कमी करण्यासाठी काय करावे

  • नियमितपणे योगा करावा.

  • मिडिटेशन केल्याने तणाव कमी होतो.

  • पोषक आणि योग्य वेळी आहार घ्यावा.

  • कॉफीचे अतिशेवन टाळावे.

  • मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT