Oral Contraceptive Pills Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

Oral Contraceptive Pills: गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गोळ्या गर्भधारणा थांबवण्याचे काम करतात, पण त्यांचे काही दुष्परिणामही आहेत.

Manish Jadhav

Oral Contraceptive Pills: आजच्या काळात महिला आपल्या करिअर, शिक्षण आणि व्यक्तिगत जीवनात संतुलन साधत आहेत. कुटुंब नियोजन (Family Planning) हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे 'ओरल कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' (Oral contraceptive pills) म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गोळ्या गर्भधारणा थांबवण्याचे काम करतात, पण त्यांचे काही दुष्परिणामही आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या गोळ्या लैंगिक संक्रमणापासून (STI) संरक्षण देत नाहीत, जे कंडोमसारख्या साधनांमध्ये मिळते.

दरम्यान, या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर सुरक्षित आहे का? यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका वाढतो का? याविषयी दिल्लीतील 'धर्मशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल'मधील 'रेडिएशन ऑन्कोलॉजी' विभागाच्या संचालक आणि क्लिनिकल हेड डॉ. कनिका सूद शर्मा यांनी माध्यमाशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली.

कर्करोग आणि गर्भनिरोधक गोळ्यांमधील संबंध

डॉ. कनिका सूद शर्मा यांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्यांचा आणि कर्करोगाचा संबंध सरळ नाही. पण, ज्या महिला 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या गोळ्यांचा वापर करतात, त्यांना काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. "आधीच्या काळात ज्या गोळ्या येत होत्या, त्या जास्त धोकादायक होत्या. सध्याच्या गोळ्या अधिक सुरक्षित असल्या तरी, त्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात," असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.

संशोधनात असे दिसून आले की, या गोळ्यांमध्ये असलेल्या हार्मोन्समुळे शरीरात काही बदल होतात, ज्यामुळे काही महिलांमध्ये (Women) ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सर होण्याचा धोका थोडा वाढू शकतो. हा धोका प्रत्येक महिलेसाठी सारखा नसतो, तो त्यांच्या कुटुंबातील कर्करोगाचा इतिहास (Family History), जीवनशैली आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असतो.

गोळ्यांचे इतर दुष्परिणाम आणि खबरदारी

डॉ. कनिका सूद शर्मा यांनी पुढे सांगितले की, जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सरचा इतिहास असेल, तर त्यांनी या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. ज्या महिलांमध्ये कर्करोगाचा धोका कमी आहे, त्यांच्यासाठी कमी कालावधीसाठी गोळ्या घेणे सुरक्षित मानले जाते.

मात्र, फक्त कर्करोगाचाच नव्हे तर इतरही अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यांची नोंद घेणे आवश्यक आहे.

  • रक्ताच्या गाठी (Blood Clots): काही महिलांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढतो.

  • मायग्रेन आणि रक्तदाब: यामुळे मायग्रेनचा त्रास आणि रक्तदाब (Blood Pressure) वाढण्याची शक्यता असते.

  • अन्य समस्या: सतत डोकेदुखी, मळमळ आणि मूड स्विंग्ससारख्या समस्याही जाणवू शकतात.

  • इतर लैंगिक आजार: या गोळ्या लैंगिक संक्रमणापासून (Sexually Transmitted Infections) संरक्षण देत नाहीत.

  • नियमितता: या गोळ्या रोज एकाच वेळी घेणे आवश्यक असते, अन्यथा त्यांचा परिणाम कमी होतो.

म्हणून, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर सुरु करण्यापूर्वी आपली संपूर्ण वैद्यकीय पार्श्वभूमी डॉक्टरांना सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच योग्य आणि सुरक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT