Ovarian Cancer: महिलांना का होतो ओव्हेरियनचा कॅन्सर? काय आहेत सुरुवातीची लक्षणे? जाणून घ्या बचावात्मक उपाय

Early Signs Of Ovarian Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच अनेक वेळा गंभीर आजार वेळेवर कळत नाहीत. असाच एक धोकादायक आजार आहे तो म्हणजे ओव्हेरियनचा कॅन्सर.
Ovarian Cancer News
Ovarian CancerDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या धावपळीच्या जीवनात महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच अनेक वेळा गंभीर आजार वेळेवर कळत नाहीत. असाच एक धोकादायक आजार आहे तो म्हणजे ओव्हेरियनचा कॅन्सर. हा आजार शरीरात शांतपणे पसरतो. जेव्हा त्याची लक्षणे दिसू लागतात तेव्हा तो बराच वाढलेला असतो. म्हणून या आजाराची वेळीच लक्षणे ओळखणे आणि समजून घेणे खूप महत्वाचे असते.

काय आहे ओवेरियनचा कॅन्सर?

ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे महिलांच्या (Women) अंडाशयात होणारा कर्करोग. महिलांच्या शरीरात दोन अंडाशय असतात, जी अंडी आणि हार्मोन्स (इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन) तयार करतात. जेव्हा या अंडाशयातील पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि ट्यूमरचे रुप धारण करतात तेव्हा त्याला ओव्हेरियनचा कॅन्सर म्हणतात. या आजारामागे अनेक कारणे असू शकतात. पोटदुखी, सूज येणे, पोट लवकर भरल्यासारखे वाटणे, वारंवार लघवी होणे, थकवा किंवा अशक्तपणा, वजन कमी होणे अशी अनेक लक्षणे असू शकतात.

Ovarian Cancer News
Eye Cancer: डोळ्यांमध्ये जळजळ, वेदना, दिसण्यात बदल? कर्करोगाचा असू शकतो इशारा; जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

वय- साधारणपणे 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना जास्त धोका असतो, परंतु तो कमी वयातही होऊ शकतो.

कुटुंबात कॅन्सरचा इतिहास- जर कुटुंबातील कोणत्याही महिलेला स्तनाचा, गर्भाशयाचा किंवा कोलनचा कर्करोग झाला असेल तर धोका वाढतो.

हार्मोनल बदल- उशिरा रजोनिवृत्ती किंवा दीर्घकाळ हार्मोनल थेरपी घेणे हे देखील याचे एक कारण असू शकते.

गर्भवती नसणे- ज्या महिलांनी कधीही गर्भधारणा केली नाही त्यांच्यामध्ये हा धोका थोडा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

अनियमित जीवनशैली- लठ्ठपणा, जंक फूड, धूम्रपान आणि मद्यपान यांसारखे घटक देखील धोका वाढवू शकतात.

Ovarian Cancer News
Stomach Cancer: वेळीच ओळखा पोटाच्या कर्करोगाची 'ही' 3 लक्षणे, शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

कोणत्या चाचणी आहेत?

पेल्विक तपासणी, अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन, CA-125 नावाची ब्लड तपासणी किंवा बायोप्सी (आवश्यक असल्यास) या चाचण्या कर्करोग आहे की नाही आणि असल्यास, तो कोणत्या टप्प्यात आहे हे निर्धारित करण्यात मदत करतात.

काय उपचार आहेत?

ओव्हेरियन कर्करोगाचा उपचार त्याच्या टप्प्यावर आणि रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतो. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोन थेरपीद्वारे या कर्करोगाच्या आजारावर उपचार केले जातात.

स्वतःचे रक्षण कसे करावे?

ओव्हेरियन कॅन्सर पूर्णपणे रोखता येत नाही, परंतु खबरदारी घेतल्यास या आाजाराचा धोका कमी होऊ शकतो, त्यामुळे हेल्दी आहार (Diet) घेणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे ठरते. शरीरातील कोणत्याही बदलांकडे दुर्लक्ष करु नका. तसेच, नियमित आरोग्य तपासणी करत राहा. जर कुटुंबात यापूर्वी अशाप्रकारचा कॅन्सर झाला असेल तर वेळोवळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com