Obesity is also an important cause of piles  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Piles: बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाला देऊ शकते आमंत्रण

हा आजार झालेल्या व्यक्तिला खूप त्रास (Trouble) होतो.

दैनिक गोमन्तक

आजच्या युगात मोबाइलचा (Mobile) इतका वापर वाढला आहे की, आपण त्यामुळे सर्वत्र पोहोचु शकतो. रात्री झोपताना देखील आपण मोबईलचा (Mobile) वापर करतो. यामुळेच आपण अनेक आजारांना (Disease) बळी पडत आहे. आपल्यापैकी अनेकजन टॉयलेटमध्ये (Toilet) सुद्धा मोबाइल घेऊन जातात. तेथे टॉयलेटच्या (Toilet) आसनावर बसून मोबाइल (Mobile) वापरुन पाइल्स (Piles) सारख्या आजाराना आमंत्रण देतात.

* पाइल्स म्हणजे काय?

पाइल्स (Piles) म्हणजे मूळव्याध. या आजारात गुदद्वाराजवळ कोंब असतो. यामुळे बऱ्याच वेळा रक्तस्त्राव देखील होतो. हा आजार झालेल्या व्यक्तिला खूप त्रास होतो. यामुळे तया व्यक्तिला बसायला सुद्धा त्रास होतो. डॉक्टरच्या मते , अनेक लोक हे सांगायला संकोच करतात. यामुळे हा त्रास वाढू शकतो.

* पाइल्सची करणे

- बद्धकोष्ठतेमुळे पाइल्स होऊ शकतात. बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नाही. यामुळे आतड्यावर झोर द्यावा लागतो. यामुळे सुद्धा पाइल्सची (Piles) समस्या निर्माण होऊ शकते.

- तसेच जे लोक दीर्घकाळ उभे राहून काम करतात त्यांनाही पाइल्सची (Piles) समस्या होऊ शकते.

- लठ्ठपणा देखील पाइल्सचा (Piles) त्रास होण्याचा एक महत्वाचे कारण आहे.

- तसेच अनेक महिलांना गर्भधारणे दरम्यान पाइल्सचा त्रास होऊ शकतो.

- तर अनेक महिलांना प्रसूतीनंतर ही समस्या निर्माण होऊ शकते.

- जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा त्रास असेल तर तुम्हाला सुद्धा हा त्रास होऊ शकतो.

* पाइल्सची लक्षणे

- शौचानंतर रक्तस्त्राव होणे

- गुदद्वारा भोवती सूज येणे.

- गुदद्वाराजवळ खाज सुटणे.

- शौचानंतर सुद्धा असे वाटणे की पोट साफ झाले नाही.

- पाइल्समधून फक्त रक्त येणे.

* ही सुद्धा काळजी घ्यावी

आपल्या घराच्या स्वच्छतागुहात संपूर्ण स्वच्छतेचे पालन करत असले तरीही घराच्या बाहेर गेल्यावर मॉलमध्ये, कार्यालयात किंवा ट्रेनमध्ये इतर कुठेही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे वापरताना ही काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांना विविध आजार असतात. यामुळेच आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. सार्वजनिक टॉयलेट जारी दिसायला स्वच्छ असले तरी अनेक लोकांनी ते वापरलेले असते. तसेच अनेक सार्वजनिक टॉयलेट स्वच्छ नसतात, यामुळे संसर्ग आणि अनेक आजार होण्याचा धोका असतो. यामुळे सार्वजनिक टॉयलेट वापरणे शक्यतो टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT