Numerology: जन्मदिवसावरून एखाद्याचे व्यक्तिमत्व कसे ओळखावे Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Numerology: जन्मदिवसावरून कसे ओळखावे एखाद्याचे व्यक्तिमत्व

रविवारी जन्माला येणारे लोक तेजस्वी असतात.

दैनिक गोमन्तक

अनेक लोक नेहमी आपल्या जन्मतारीख किंवा महिन्यावर आधारित आपले भविष्य पाहण्यास उत्सुक असतात. पण जन्मदिवस देखील तेवढाच महत्वाचा आहे. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात त्या दिवसावर तुमच्या गुणधर्माबद्दल बोलले जाते. यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.

* रविवार

रविवारी जन्माला येणारे लोक तेजस्वी असतात. कारण रवी म्हणजे सूर्य आणि सूर्य एक तेजस्वी तारा आहे. हे लोक आपले काम यशस्वीरित्या पूर्ण करतात. यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. हे लोक दयाळू असतात. तसेच हे लोक खरे बोलणारे असतात. या लोकांची लगेच मैत्री होते.

* सोमवार

सोमवारला जन्माला येणारे लोक चंद्राप्रमाणेच शांत असतात. हे लोक स्वभावाने दयाळू, उदार असतात. या दिवशी जन्मलेले लोक कुटुंबाची काळजी घेणारे असतात. हे लोक स्त्रियांचा अधिक सन्मान करतात. तसेच हे लोक कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणारे असतात. असे लोक तथ्यापेक्षा अनुभवांवर आधिल विश्वास ठेवतात. निरोगी आणि आनंदी जीवनासाठी सोमवारी जन्मलेल्या लोकांनी महादेवाची आणि गणपतीची पूजा करावी.

* मंगळवार

मंगळवारी जन्माला आलेल्या लोकांवर मंगळाचे राज्य असते. असे लोक कठीण परिस्थितीतसुद्धा योग्य मार्ग काढतात. हे लोक समस्यांना तोंड देण्यास नेहमी समर्थ असतात. आयुष्यकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा उत्साही असतो. यामुळेच असे लोक इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. पण या लोकांनी मंगळवारी दान करणे आवश्यक आहे.

* बुधवार

बुधवारी जन्माला आलेले लोक बुधचे अधिराज्य असते. हे लोक जिज्ञासू असतात. या लोकांकडे चांगले संभाषण करण्याचे कौशल्य असते. या लोकांना नवीन कला शिकण्याची इच्छा असते. या लोकांकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोन असल्याने कोणत्याही अडचणीशिवाय हे लोक आव्हानांचा सामना करू शकतात. या लोकांचा लकी नंबर पाच आहे. या लोकांनी आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी बुधवारी धार्मिक कार्य करावे.

* गुरुवार

गुरुवारी जन्मलेल्या लोकांवर बृहस्पतिचे राज्य असते. हे ज्योतिषशास्त्रामधील सर्वात प्रभावशाली ग्रह आहे. असे लोक दृढ निश्चयी असतात. हे लोक इतर लोकांप्रती उदार आणि दयाळु असतात. हे लोक जन्माला आलेले शिक्षक आणि मुक्त उत्साही विद्यार्थी असतात म्हणून ते सर्वांचे लाडके असतात.

* शुक्रवार

शुक्रवारी जन्मलेल्यांवर लोकांवर शुक्र राज्य करतो. हे लोक स्वभावाने प्रेमळ असतात. या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. हे लोक आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल चांगल्या प्रकारे राखतात. अशा लोकांनी स्वभावाने प्रेमळ असलेला व्यक्ति जोडीदार महणून निवडावा.

* शनिवार

शनिवारी जन्मलेल्या लोकांवर शनिचा प्रभाव असतो. या लोकाना खूप संघर्ष करावे लागते. पण हे लोक मनाने मजबूत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जातात. हे लोक बुद्धिवान आणि शिस्तबद्ध असतात. हे लोक गर्विष्ठ दिसतात पण स्वभावाने चांगले असतात. असा लोकांनी आपल्या आयुष्यातील संकट कमी करण्यासाठी शनिवारी धर्मदान करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT