Onion Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Patient: ...आता कांद्याच्या रसाने काही मिनिटांत नियंत्रणात येईल मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे खूप आव्हानात्मक असते, परंतु हे काम कांद्याच्या मदतीने सहज करता येते.

दैनिक गोमन्तक

आजकाल मधुमेहाचा आजार सर्व वयोगटातील लोकांना झपाट्याने आपल्या कवेत घेत आहे. येत्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हा असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होतो आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढते.

(Now diabetes can be controlled in few minutes with onion juice)

उपचाराने मधुमेह पूर्णपणे नाहीसा होऊ शकत नाही, परंतु औषध आणि आहाराची काळजी घेऊन तो नियंत्रित केला जाऊ शकतो. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील प्रभावी ठरू शकतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा एक सोपा उपाय समोर आला आहे.

कांद्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील सॅन डिएगो येथे एंडोक्राइन सोसायटीची वार्षिक बैठक झाली, त्यात संशोधन सादर करताना संशोधकांनी मधुमेहावरील सर्वात स्वस्त पर्यायाबद्दल सांगितले. ब्रिटीश वेबसाइट एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, या संशोधनात असे समोर आले आहे की, दररोज कांद्याचा रस सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

या संशोधनात मधुमेही उंदरांना 400 मिलीग्राम आणि 600 मिलीग्राम कांद्याचा रस देण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 50 आणि 35% कमी झाली. विशेष म्हणजे कांद्याच्या रसाने उच्च कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.

कांदा औषधाप्रमाणे काम करतो का?

संशोधकांचे म्हणणे आहे की कांद्याचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांची रक्तातील साखर कमी होते आणि वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. याद्वारे कोलेस्टेरॉलही बऱ्याच अंशी नियंत्रित करता येते. लोकांच्या घरी कांदा सहज उपलब्ध होतो आणि तो लोकांच्या आरोग्यासाठी औषध म्हणून काम करू शकतो. संशोधकांनी याचे वर्णन मधुमेह नियंत्रित करण्याचा सर्वात स्वस्त, सहज उपलब्ध आणि प्रभावी मार्ग म्हणून केला आहे. कांदा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो आणि रोगांपासून वाचवण्यास मदत करतो. हे वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते. मात्र रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचा अर्क म्हणजेच रस सेवन करणे फायदेशीर ठरते.

घरी कांद्यापासून औषध कसे तयार करावे?

मधुमेही रुग्ण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याचा वापर करू शकतात. यासाठी त्यांना कांदा घ्यावा लागतो आणि त्याचा रस काढावा लागतो आणि नंतर त्याचे विशिष्ट प्रमाणात सेवन करावे लागते. साधारणपणे तुम्ही 100 ते 200 मिलीग्राम रस घेऊ शकता. जर तुम्हाला त्याचा फायदा होत असेल तर तुम्ही ते वापरणे सुरू ठेवू शकता. तथापि, हे करण्यापूर्वी, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT