Cancer Fever Symptoms Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cancer Fever Symptoms: सामान्य ताप देखील असु शकते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं एक लक्षण

ताप आल्यास वेळीच आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमन्तक

ताप येणे सामान्य आजार मानला जातो. तसेच ताप हा तीन ते चार दिवसांत बरा होतो. ताप येण्याची अनेक कारणे आहेत आणि शरीरात कोणत्याही प्रकारचा कर्करोग वाढल्यानेही ताप येऊ शकतो. कर्करोग शरीराच्या ऊतींवर हल्ला करतो आणि हळूहळू त्यांचे नुकसान करतो आणि वाढत राहतो. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला ताप येऊ शकतो.

असे मानले जाते की रक्त कर्करोगासह अनेक प्रकारचे कर्करोग शरीराचे तापमान वाढवू शकतात. चिंतेची बाब म्हणजे अनेकांना हा ताप हवामानातील बदलामुळे आहे की सर्दी-फ्लूमुळे आहे की शरीरातील कर्करोगामुळे आहे हे लवकर समजत नाही. कर्करागामधील ताप हा सामान्य तापापेक्षा कसा वेगळा असतो आणि तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊ या.


ब्लड कॅन्सरमध्ये अधिक धोका

ताप हे सर्व प्रकारच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे. ल्युकेमिया आणि लिम्फोमा सारख्या ब्लड कॅन्सरमध्ये सर्वात सामान्य असले तरी जेव्हा कर्करोगाच्या रूग्णांमध्ये पायरेक्सिया असतो, तेव्हा हे सामान्यतः कॅन्सर उद्भवल्याचे किंवा पसरल्याचे लक्षण असते. कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते , या प्रकारच्या तापामुळे अस्वस्थता जाणवते. रुग्णांसाठी आणि काळजी घेणाऱ्यांसाठी चिंतेचे कारण असू शकते.

अन्य कर्करोगात कसा येतो ताप

ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर यांमध्ये ताप येण्याची शक्यता कमी असते. या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा ट्यूमर यकृतामध्ये पसरला असल्यास त्याला ताप येऊ शकतो. कर्करोगामुळे शरीरात कुठेतरी अडथळा निर्माण होत असल्याचेही हे लक्षण असू शकते.

  • ताप येण्याचे कारण

काही प्रकारच्या कर्करोगामुळे जास्त ताप का येतो हे स्पष्टपणे सांगता येत नाही . असे मानले जाते की काही रोग विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे ताप येऊ शकतो. असे म्हटले जाते की ट्यूमरच्या निर्मितीमुळे पायरोजेन्स होऊ शकतात. हा एक विषारी पदार्थ आहे ज्यामुळे ताप येतो.

Fever
  • अचानक रात्री घाम येणे

ताप हे शरीरातील दाहक प्रतिक्रियांचे लक्षण आहे. शरीरातून उष्णता काढून टाकण्यासाठी शरीर घामाने तापास प्रतिसाद देऊ शकते. हेच कारण आहे की कर्करोगाच्या रुग्णांना निदानापूर्वी अनेकदा रात्री घाम येतो. यामुळे तापाकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT