गोवा पर्यटनस्थळामध्ये एक प्रसिध्द ठिकाण आहे. यामुळे येथे अनेक लोक येथे भटकंती करायला येतात. ख्रिसमस असो वा नवे वर्ष गोव्याला (Goa) जाण्याचा अनेक लोक प्लॅन करत असतात. यामध्ये असेही काही लोक असतात ज्यांना ग्रुपसोबत न जाता एकट्याने प्रवास करायला आवडते. सध्या सोलो ट्रिपचा ट्रेंड आहे. यामध्ये महिला देखील मागे नाही. अनेक मुली बिनधास्तपणे प्रवासाला निघतात; पण सोलो ट्रिप करतांना स्त्रियांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे देखील लक्ष दिले पाहिजे. म्हणून सोलो ट्रिप (Solo Trip) करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेउया.
ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात ज्या जागेची व्यवस्थित माहिती घ्या.
तुम्ही राहत असलेल्या हॉटेलची माहिती, लोकेशन, पत्ता, फोटो व संपर्क क्रमांक कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा.
प्रवासादरम्यान तुमची वैयक्तिक माहिती शक्यतो कोणाला सांगू नका.
तुम्ही टुरिस्ट असाल तर प्रवासादरम्यान लागणारे कागदपत्र, पासपोर्ट, तिकीट व्यवस्थित ठेवा.
आत्मविश्वासाने वावर करा.
सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती साधने तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. उदा. पेपर स्प्रे, सेफ्टी अलार्म.
कोणी खायला आणि प्यायला दिले तर घेउ नका.
गोवा पिंक पोलिस फोर्सचा हेल्प लाईन नं. फोनमध्ये सेव असु द्या.
ज्या ठिकाणी फिरायला गेले आहात त्याची पुर्ण माहिती घ्या.
संकटाच्यावेळी स्व:ताचा बचाव करता यायला हवा.
फिरतांना घरच्यासोबत सतत लोकेशन शेअर करा.
गोव्यात Ola, Uber यांची सोय नाही त्यामुळे तुम्ही रेंटने बाईक घेऊ शकता. गोव्यात फिरण्याचा आनंद घेउ शकतो.
बसमध्ये प्रवास करतांना घरच्यांना लोकेशन शेअर करावे. तसेच पेपर स्प्रे सारख्या काही वस्तु जवळ ठेवाव्या.
उघड्यावरील पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तुमची ट्रिप नक्कीच अविस्मरणीय होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.