Cake Ideas 2023
Cake Ideas 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cake Ideas 2023: न्यु इयरचं स्वागत करा 'या' शुगर फ्री केकने

दैनिक गोमन्तक

नवीन वर्षाच्या (New Year Party) पार्टीसाठी केकची रेसिपी शोधत असाल तर या रेसिपी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बरेच लोक केक खाणं टाळतात कारण त्यात मिठाई आणि हाय कॅलरी असतात. अनेकदा आपण जे नियमित केक खातो त्यामुळे कधी कधी अॅसिडीटी, ब्लोटिंग, लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्या वाढू शकते. तुम्ही हंगामी फळांपासून बनवलेला हा केक खाऊ शकता. चला तर मग नवीन वर्षाच्या केकची (Cake) रेसिपी जाणून घेउया.

  • दालचिनी मसाला मफिन केक

दालचिनी मसाला मफिन केक बनवायला जितका सोपा आहे तितकाच तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये सूक्ष्म मफिन बनवले जातात. ज्यामध्ये बेकिंगमध्ये ब्राऊन शुगर आणि दालचिनी वापरली जाते. ते बनवण्यासाठी तुम्ही भरड धान्यापासून बनवलेले पीठ देखील वापरू शकता. सजवण्यासाठी तुम्ही प्रोटीनयुक्त ग्रीक दही देखील वापरू शकता.

  • गाजर केक

गाजर केक हा मुळात पीठ आणि गाजरांच्या मदतीने बनवला जातो. हा केक आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. कारण त्यामुळे वजन वाढत नाही तसेच पचनसंस्था देखील चांगली राहते. यासोबतच गाजरातील ‘अ’ जीवनसत्त्व मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.

Apple Cake
  • बदाम आणि स्ट्रॉबेरी केक

हा लो फॅट केक मधुमेहाच्या रुग्णांसाठीही चांगला आहे. बदाम आणि स्ट्रॉबेरीला मिक्स करून यामध्ये वापरतात. यामध्ये तुम्ही कस्टर्ड पावडर आणि इतर फळे आणि वरून ड्रायफ्रूट्सने सजवू शकता. हे जेवढे खायला चविष्ट आहे, तेवढेच पचायलाही सोपे आहे. तसेच, ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही.

  • सफरचंद चॉकलेट केक

गोड क्रीम चीज फ्रॉस्टिंग असलेला हा सफरचंद केक (Apple Cake) खाण्यास चवदार आणि आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे. या सफरचंदाच्या केकमध्ये साखरेचा वापर कमी प्रमाणात केला जातो आणि गोडपणासाठी मध वापरला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT