नवीन कपडे तयार करतांना त्यात अनेक जंतु आणि बॅक्टेरिया असतात. यामुळे तुम्हाला त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. चला तर मग जाणून घेवूया
नवीन कपडे न धुता घातल्यास कोणते नुकसान होऊ शकतात. Dainik Gomantak
कारखान्यात कपडे तयार केल्यानंतर ते पॅक केले जातात आणि स्टोअरमध्ये पोहोचण्यापूर्वी विविध ठिकाणच्या वाहतुकीच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जातात. कापड कोठे ठेवले आणि ते कसे नेले गेले याचा शोध घेणे कठीण आहे. म्हणूनच नवीन कपडे घालण्यापूर्वी धुणे आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तुमचे नवीन कपडे अनेक जंतूच्या संपर्कात येवू शकतात. आपण हे सूक्ष्मजीव पाहू शकत नाही. म्हणून आपण नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते स्वच्छ धुणच घालावे. जर तुम्ही नवीन कपडे न धुता घालत असाल तर तुम्हाला त्वचेवर पुरळ येवून एलर्जी होण्याची शक्यता असते.
मोठ्या फॅशन स्टोअरमध्ये लोक प्रथम ड्रेस घालून पाहतात. नंतरच ते त्यांच्यासाठी खरेदी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का ते कपडे याआधी कीती लोकांनी ट्राय केलेअसतील. यामुळेच नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते धुवावे आणि नंतरच घालावे.