Neurodivergent Conditions In Kids Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Neurodivergent Syndrome: काय आहे न्यूरोडायव्हर्जंट स्पेक्ट्रम? मुले का ठरतात या आजाराचे शिकार? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Neurodivergent Conditions In Kids: न्यूरोडायव्हर्जन्स हा एकच आजार किंवा सिंड्रोम नाही. यामध्ये मेंदू थोडा वेगळ्या पद्धतीने काम करतो. या श्रेणीत काही मानसिक समस्या येतात.

Manish Jadhav

Neurodivergent Syndrome: आमिर खानचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट खूप खास आहे. यामध्ये आमिरसोबत 10 नवीन चेहरे काम करत आहेत, जे न्यूरोडायव्हर्जंट आहेत. हे कलाकार विशेष मुले आहेत, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सिंड्रोम आहेत. त्यांना न्यूरोडायव्हर्जंट म्हणतात. तज्ञांच्या मते, न्यूरोडायव्हर्जंट अशा मुलांना म्हणतात, ज्यांचा मेंदू सामान्य मुलांपेक्षा विचार करण्यात, समजून घेण्यात आणि अनुभवण्यात थोडा वेगळा असतो.

क्लीव्हलँडक्लिनिकच्या मते, न्यूरोडायव्हर्जन्स हा एकच आजार किंवा सिंड्रोम नाही. यामध्ये मेंदू थोडा वेगळ्या पद्धतीने काम करतो. या श्रेणीत काही मानसिक समस्या येतात. जसे की ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, एडीएचडी, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्प्रॅक्सिया, टॉरेट सिंड्रोम. हे सर्व असे सिंड्रोम आहेत, यामध्ये शिकार ठरलेले मुले नेहमीच सामान्य मुलांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागतात. या सिंड्रोमवर काही ठोस इलाज नाही. तो केवळ नियंत्रित केला जाऊ शकतो.

न्यूरोडायव्हर्जंट असलेली मुले अभ्यासात मागे पडतात का?

दिल्ली एम्समधील बालरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. राकेश कुमार बागडी सांगतात, न्यूरोडायव्हर्जंट असण्याचा अर्थ असा नाही की मूल कमी बुद्धिमान आहे किंवा त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. न्यूरोडायव्हर्जंट असलेली मुले अभ्यासात गतिमान असतीलच असे नाही. त्यांचा मेंदू अधिक सर्जनशील असू शकतो. त्यांना कला आणि संगीतात (Music) रस असू शकतो. मात्र, त्यांना केवळ थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची आणि समजावून सांगण्याची आवश्यकता असते. त्यांची सामान्य मुलांपेक्षा थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. योग्य मार्गदर्शन आणि पाठिंब्याने अशी मुले असाधारण यश मिळवू शकतात.

न्यूरोडायव्हर्जन्स रोखणे किंवा त्यावर उपचार करणे शक्य आहे का?

डॉ. राकेश सांगतात, न्यूरोडायव्हर्जन्स म्हणजे व्यक्तीचा मेंदू ज्या पद्धतीने विकसित झाला पाहिजे तसा होत नाही. कारण हे अनुवांशिक कारणांमुळे होते. तो केवळ नियंत्रित करता येतो. काही लोकांसाठी जसे की एडीएचडी असलेल्यांसाठी व्यवहारिक थेरपी आणि औषधे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारु शकतात. योग्य मार्गदर्शन आणि काळजी घेऊन ही मुले (Children) सामान्य जीवन देखील जगू शकतात. मात्र या मुलांना समाजापासून वेगळे मानले जाऊ नये. त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवन चांगले बनवण्यासाठी काम केले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT