Bubbling Lake In Goa Dainik Gomantak
नेत्रावलीच्या शांत आणि प्रसन्न गावात वसलेला हा तलाव त्याच्या बुडबुड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे बुडबुडे तलावातील विविध ठिकाणी सतत पृष्ठभागावर उठतात. बुडबुड्याची ताली आणि बबल लेक सारख्या अनेक नावांनी ओळखला जाणारा हा तलाव ध्वनींना प्रतिसाद देताना दिसतात आणि विलक्षण गोष्ट म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवल्यास वेगाने येतात. नेत्रावलीमध्ये बबलींग लेक म्हणून प्रसिद्ध असणार तलाव एक सुंदर नैसर्गिक चमत्कार आहे. 'बबलिंग' या शब्दाचा अर्थ कोंकणीमध्ये बुडबुडे आहे. सरोवराच्या खालून नियमित अंतराने बुडबुडे येतात आणि पाण्याच्या वरती येऊन फुटल्याने आकर्षक केंद्रीत वर्तुळे किंवा पाण्यात लहरी तयार होतात. मंत्रमुग्ध करणारे हे ठिकाण लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुद्धा नेहमीच अकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत आहे. या बुडबुड्यांच्या उत्पत्तीचे अनेक वेगवेगळी करणे आहेत. काहींचा असा दावा आहे की ते स्थानिक देवतेचे कार्य आहेत, तर इतर काहींचे म्हणणे आहे की ते कार्बन किंवा सल्फर डायऑक्साइड वायूमुळे होते. सरोवरात अनेक प्रजातींचे भरपूर मासे आहेत या उपस्थितीमुळे मिथेनला कारणीभूत सिद्धांत नाकारला गेला आहे. या तळ्यातील बुडबुड्यांचे खरे गूढ आजही कायम आहे, ही एक निसर्गाची जादुच म्हणवी लागेल. या तलावाची आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा कोणी तलावाजवळ टाळ्या वाजवतो तेव्हा बुडबुडे वेगाने दिसतात. स्थानिकांच्या म्हणण्या नुसार इथं आणखी एक कारण समोर येतं ते म्हणजे ध्वनीशास्त्राचा फुग्यांच्या निर्मितीशी काही तरी संबंध आहे; परंतु अद्याप कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण समोर आलेले नाही. निसर्गाची अनोखी किमया असलेल्या या बबलींग लेकला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी अधिक आकर्षक बनवण्यासाठी, तलाव आणि त्याच्या सभोवताल परिसर सुशोभिकारणाचा गोवा सरकारने एक मोठा प्रयत्न केला आहे. या तलावामुळे गोव्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.