मान आणि पाठदुखी हा आजकाल एक सामान्य त्रास बनला आहे. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणे, सतत मोबाईल किंवा लॅपटॉपकडे झुकून पाहणे, चुकीच्या पद्धतीने झोपणे किंवा जड वस्तू उचलणे यामुळे ही समस्या वाढते. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही वेदना काही वेळा गंभीर आजाराचं संकेतही असू शकते. विशेषतः ही वेदना विश्रांतीनंतरही कमी होत नसेल किंवा दैनंदिन कामांवर परिणाम करत असेल, तर दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
जर तुम्हाला विशेषतः सकाळी उठल्यानंतर मान जड वाटत असेल, वेदना जाणवत असेल, तर हे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचे लक्षण असू शकते. या आजारात मानेच्या हाडांवर आणि आजूबाजूच्या नसा दाबल्या जातात. त्यामुळे हातात मुंग्या येणे, बधीरपणा वाटणे अशी लक्षणंही दिसून येतात. ही समस्या जास्तकरून संगणकावर तासन्तास काम करणाऱ्या किंवा सतत मोबाईल वापरणाऱ्यांमध्ये दिसून येते.
एलएनजेपी हॉस्पिटल, दिल्लीचे माजी ऑर्थोपेडिक प्रमुख डॉ. रोहन कृष्णा म्हणतात, या अवस्थेत मानेतील हाडांमधील अंतर कमी होतं, डिस्कवर दबाव येतो आणि मज्जातंतूंवर ताण निर्माण होतो. त्यामुळे मानेपासून पाठीपर्यंत वेदना जाणवू शकते.
सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसमध्ये, मानेच्या हाडांमधील आणि डिस्कमधील जागा कमी होऊ शकते. या आजारात, मज्जातंतूंच्या मुळांवर किंवा पाठीच्या कण्यावर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे पाठीपासून मानेपर्यंत वेदना जाणवतात.
आपल्या पाठीच्या मणक्यांमध्ये झटके कमी करण्यासाठी डिस्क असतात. परंतु काही वेळा या डिस्क जागेवरून सरकतात आणि पाठीच्या कण्यातील नसा दाबल्या जातात. ही स्थिती स्लिप डिस्क म्हणून ओळखली जाते. यामुळे मानेत किंवा कंबरेत तीव्र वेदना होते. यासोबत हात-पायात जळजळ, सुन्नपणा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.
जर तुम्ही जड वस्तू उचलल्या असतील, चुकीच्या स्थितीत बसले किंवा झोपले असाल, तर मानेच्या वा पाठीच्या स्नायूंवर ताण येऊन वेदना होऊ शकते. सहसा ही वेदना गरम पाण्याच्या शेकाने, विश्रांतीने किंवा हलक्या व्यायामाने कमी होते. पण ही वेदना सातत्याने राहिल्यास ती खोल स्नायू दुखण्याचं संकेत असू शकते.
बर्याच वेळा लोक मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे होणाऱ्या कंबरदुखीकडे दुर्लक्ष करतात. जर कंबरदुखीबरोबर लघवी करताना जळजळ होत असेल, वारंवार लघवी लागतेय किंवा लघवीत रक्त दिसत असेल, तर हे मूत्रपिंडाच्या दगडाचं किंवा आजाराचं लक्षण असू शकतं.
वेदना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिल्यास
वेदना हात-पायांमध्ये पसरत असल्यास
मुंग्या येणे, बधीरपणा, अशक्तपणा जाणवत असल्यास
ताप येत असल्यास, वजन कमी होत असल्यास
विश्रांतीनंतरही वेदना कमी न झाल्यास
मान आणि पाठदुखी ही एखाद्या आजाराची लक्षणं असू शकतात. ती वेळेत ओळखून योग्य उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.