Manish Jadhav
मीठ हा आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे.
मीठ केवळ चवीसाठीच महत्त्वाचे नाही तर ते आपल्या शरीरासाठी देखील गरजेचे आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, महिनाभर मीठाचे सेवन नाही केले तर शरीरावर काय परिणाम होईल... चला तर मग याविषयी जाणून घेऊया...
मीठ न खाणे जितके हानिकारक असू शकते तितकेच जास्त मीठ खाणे देखील तितकेच हानिकारक आहे.
जर तुम्ही महिनाभर मीठ सेवन केले नाही तर शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होऊ शकते.
तसेच, शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते.
जर तुम्ही मीठ खाणे पूर्णपणे बंद केले तर शरीरातील आयोडीनची पातळी कमी होऊ शकते.