Navratri Special Food: घ्या नमकीन ड्राय फ्रुट्सचा स्वाद  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Special Food: घ्या नमकीन ड्राय फ्रुट्सचा स्वाद

नमकीन ड्राय फ्रुट्स निरोगी आरोग्यासाठी लाभदायी असते.

दैनिक गोमन्तक

नवरात्रीचा उपवास अनेक महिला करतात. पण उपवासा दरम्यान आपल्याला अनेक प्रकारचे स्नॅक्स खाण्याची इच्छा होते. तेव्हा तुम्ही नमकीन ड्राय फ्रुट्स बनवू शकता. हे चवदार असून निरोगी आरोग्यासाठी लाभदायी असते. हे बनवणे अगदी सोपे आहे. तुम्ही नमकीन ड्राय फ्रुट्स हा पदार्थ चहासोबत सुद्धा खाऊ शकता. हे तयार करण्यासाठी तुम्हाला मखाना आणि काजू, बदाम यासारखे सुकामेवा आणि काळी मिरी आवश्यकता असणार. चला तर मग जाणून घेवूया याची रेसिपी .

* नमकीन ड्राय फ्रुट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मखाना - 1 कप

  • काजू- 3 मोठे चमचे

  • नारळ - 2 मोठे चमचे

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • बदाम - 3 चमचे

  • मनुका- 2 चमचे

  • काळी मिरी - 1/4 छोटा चमचा

  • तूप- 2 चमचे

सर्वात पहिले तूप गरम करावे. त्यात मखाना मंद आचेवर तळून घ्यावे. 5 ते 6 मिनिटानंतर ते काढून घ्यावे. नंतर 1 चमच तुपात कढीपत्ता, काजू , बदाम, मनुका आणि खोबऱ्याचे काप चांगले मिक्स करावे. हे सर्व सुकमेवे 5 मिनिटे कमी आचेवर भाजून घ्या. नंतर हे मिश्रण मखानामध्ये मिक्स करावे. सर्वात शेवटी मीठ, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर घालून चांगले मिक्स करावे. तुम्ही लगेच खाऊ शकता किंवा हवाबंद डब्यात ठेवू शकता.

* मखाना खाण्याचे फायदे

मखाना हे आरोग्यासाठी लाभदायी आहे. मखानाचे (Makhana) सेवन केल्याने ह्रदयाचे (Heart) आरोग्य चांगले राहते. मखानामुळे अशक्तपना (Weakness) कमी होण्यास मदत मिळते. तसेच हाडांचे (Bones) आरोग्यसुद्धा मजबूत होते. मखानामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह , फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT