Navratri Tips
Navratri Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Tips: मेष, धनु राशीसह 'या' राशींसाठी लाभदायक आहे नवरात्रोत्सव

गोमन्तक डिजिटल टीम

पवित्र शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात अनेक भाविक उपवास करतात. नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दररोज श्री दुर्गा चालिसाचे पठण करावे. दुर्गा चालिसाचे पठण केल्याने दुर्गादेवीची विशेष कृपा होते. नवरात्रीमध्ये पाच विशेष राशींवर दुर्गादेवीची विशेष कृपा असते. मेष, वृषभ, वृश्चिक, धनु आणि कुंभ या राशींवर शारदीय नवरात्रीत दुर्गादेवीची विशेष कृपा असते.

मेष

नवरात्रोत्सवाच्या काळात मेष राशीच्या लोकांची शक्ती वाढेल. तुम्हाला उच्च पद मिळेल. तर, नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांचा नवरात्रोत्सवाच्या काळात मान-सन्मान वाढेल. जुन्या कर्जातून मुक्त होण्यासाठी अनेक नवीन संसाधने निर्माण होतील. तसेच, कुटुंबातील संबंधांमध्ये पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ खूप खास आहे.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी मान-सन्मान वाढवण्याच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, दुःखातून मुक्ती मिळेल

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना संपत्ती गोळा करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या कामात यश मिळेल. या नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या नक्षत्रानुसार पाच राशींवर आई जगदंबेची कृपा राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT