Navratri 2023 Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri 2023: नवरात्रीत अशी घ्या चेहऱ्याची काळजी, घरबसल्या मिळेल पार्लसारखी चमक

Navratri 2023: नवरात्रीत चेहरा ग्लोइंग दिसण्यासाठी तुम्ही पुढिल टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Navratri 2023 Skin Care Tips: यंदा 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. सर्वत्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उपवास आणि उपासना तसेच पोशाख आणि मेकअप कसा करावा याचीही काळजी घेतली जाते.

नवरात्रोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. तुम्ही चमकदार त्वचेसाठी पुढे सांगितलेल्या काही ब्युटी टिप्स फॉलो करू शकता.

त्वचेची कशी काळजी घ्यावी

स्टेप 1

क्लींजिंग करणे

सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिले आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. यासाठी फेस वॉशचा वापर करणे चेहऱ्यासाठी चांगले असते.  बाजारात चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट मिळतात.

स्टेप 2

टोनिंग

चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्याला टोनिंग करावे.  टोनर पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते.

स्टेप 3

सीरमचा वापर

टोनर व्यतिरिक्त सीरम त्वचेला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करते. सीरममध्ये असलेले गुणधर्म त्वचेला चमकदार करण्याचे काम करतात. बाजारात अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत, म्हणून ते निवडताना त्वचेचा टाईप लक्षात ठेवावा.

स्टेप 4

मॉइश्चरायझर

त्वचा चमकदार बनवण्यासाठी ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. जर त्वचेत ओलावा नसेल तर ती कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे त्वचेवर खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर नियमितपणे लावावे.

स्टेप 5

सनस्क्रीन

त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन केवळ उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करत नाही तर प्रदूषणापासून बचाव करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Giorgia Meloni Photo: डीपफेकच्या विळख्यात इटलीच्या PM! बनावट फोटो व्हायरल करणाऱ्या युजरला मेलोनींनी झापलं; प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी एआयचा वापर

Sarvan Comunidade Land Scam: सर्वण कोमुनिदादची 25 हजार मीटर जमीन परस्पर फस्त, मोठा आर्थिक घोटाळा उघड; गावकऱ्यांना अंधारात ठेवून बिल्डरला जमिनीची विक्री

Grah Gochar 2026: नशिबाचा 'डबल' धमाका! पाच राशींना मिळणार भाग्याची साथ; सूर्य-शुक्र आणि शुक्र-गुरुचा 'द्विद्वादश योग' ठरणार वरदान

खरी कुजबुज: आता तरी होणार का गोवा सरकार ‘स्मार्ट’?

Curchorem Sexual Assault Case: लज्जास्पद कबुलीनंतर आता बेकायदेशीर अटकेचा ठपका, क्राईम ब्रँचची मोठी नाचक्की; कुडचडे वासनाकांडातील सोहमला मिळणार जामीन?

SCROLL FOR NEXT