Navratri 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri 2022: 'या' दिवसापासून सुरू होतोय नवरात्रोत्सव, वाचा सविस्तर एका क्लिकवर

देवी भागवत पुराणात नवरात्रीत माता देवीच्या स्वारीचे विशेष महत्त्व सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

नवरात्री माता जगदंबाचा उत्सव, वर्षातून चार वेळा साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा, हवन, यज्ञ, जागरते, गरबा असे आयोजन केले जाते. नवरात्रीमध्ये सर्वत्र लोक शक्तीच्या भक्तीत लीन असतात. नऊ दिवस मातेची यथायोग्य पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला जाणून घेऊया शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे.

नवरात्र 2022 मुहूर्त

शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवारपासून 26 सप्टेंबर 2022 पासून होणार आहे. 5 ऑक्टोबर 2022 रोजी नवरात्रीची समाप्ती होईल.

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा 26 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 3.24 पासून सुरू होईल. प्रतिपदा तिथी 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 03.08 वाजता समाप्त होईल. या वेळी शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना मुहूर्त 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 06.20 ते 10.19 पर्यंत असेल.

देवी भागवत पुराणात नवरात्रीत माता देवीच्या स्वारीचे विशेष महत्त्व सांगितले आहे. दरवर्षी आई वेगवेगळ्या वाहनांतून येते. आईचे प्रत्येक वाहन एक खास संदेश देते. पुराणानुसार रविवार किंवा सोमवारपासून नवरात्र सुरू होते. तेव्हा माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते. म्हणजेच यावेळी दुर्गादेवीचे आगमन हत्तीवरून होणार आहे. हे शांती आणि समृद्धीचे लक्षण आहे. या वेळी शारदीय नवरात्री माता देवी हत्तीवर स्वार होऊन सर्वांचे जीवन आनंदाने भरून जाईल.

नवरात्री 2022 महत्वाची तारीख

नवरात्री अष्टमी तारीख - 3 ऑक्टोबर 2022

नवरात्री नवमी तारीख - 4 ऑक्टोबर 2022

नवरात्री दशमी तिथी - 5 ऑक्टोबर 2022

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT