Navratri Festival  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Navratri Festival: नवरात्रीत चुकूनही करू नका हे काम

नवरात्रीत आई देवीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी करू नका.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदा कोरोनानंतर जल्लोषात हा सण साजरा होणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नवीन रूपांची पूजा केली जाते. यामुळे आइ देवी भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देतात. नवरात्रीच्या काळात भक्तांनी चुकूनही या गोष्टी करू नये नाहीतर आई देवी नाराज होते.

नवरात्र कधीपासुन होणार सुरू  

हिंदू कॅलेंडरनुसार, नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सुरू होते आणि दशमी तिथीला संपते. यावर्षी नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 पासून होत आहे. 5 ऑक्टोबर रोजी संपत आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची मोठ्या विधीपूर्वक पूजा केली जाते.

मुलींचे मन दुखवू नका

हिंदू धर्मात मुलींना माँ दुर्गेचे रूप मानले जाते . त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्या किंवा कंजकाची पूजा करण्याचा नियम आहे. नवरात्रीमध्ये कोणत्याही मुली किंवा स्त्रीच्या मनात वाईट विचार आणू नका, अन्यथा माँ दुर्गा कोप होऊ शकते.  

नवरात्रीच्या काळात घराबाहेर पडू नका

नवरात्री व्रताचा कलश घरात प्रज्वलित केला असेल किंवा अखंड ज्योत प्रज्वलित असेल तर नवरात्रीच्या काळात घराबाहेर पडू नये. यामुळे आई देवी तुमच्यावर नाराज होउ शकते.

कलह किंवा वादापासून दूर राहा

नवरात्रीच्या काळात भक्तांनी कोणत्याही प्रकारच्या कलह किंवा वादापासून दूर राहावे. कारण कलह किंवा वादामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला त्रास होतो . यामुळे देवी माता कोपू शकते. असो, भांडण झालेल्या घरात मां लक्ष्मी वास करत नाही, अशी धार्मिक धारणा आहे.

लसूण कांद्याचे सेवन करू नका

नवरात्रीच्या (Navratri ) पवित्र दिवसात सात्त्विकतेची विशेष काळजी घ्यावी. लसूण आणि कांदा तामसिक आहारात येतो. याच्या सेवनाने मनात वाईट विचार निर्माण होतात. यामुळे मातेच्या पूजेला बाधा येते. परिणामी, मन संतप्त होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: साडेचार हजार मतांचा फायदा कोणाला?

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

Surya Gochar 2026: हस्त नक्षत्रात सूर्याचे आगमन! 5 भाग्यवान राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

SCROLL FOR NEXT