Income Tax Day 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

National Income Tax Day 2023: 24 जुलैलाच का साजरा केला जातो इनकम टॅक्स डे, वाचा एका क्लिकवर

भारतात हा दिवस 2010 पासून साजरा करण्यास सुरूवात झाली. चला जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास काय आहे.

Puja Bonkile

National Income Tax Day 2023: दरवर्षी 24 जुलै हा दिवस राष्ट्रीय आयकर दिन म्हणून साजरा केला जातो.

आयकर दिन साजरा करण्याची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वी झाली असली, तरी त्यानंतर कर नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. 

भारतात हा दिवस 2010 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ दरवर्षी हा दिवस थाटामाटात साजरा करते.

चला जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास काय आहे आणि हा दिवस 24 जुलैलाच का साजरा केला जातो?

  • राष्ट्रीय आयकर दिनाचा इतिहास

आपल्या देशात 24 जुलै 1860 रोजी शुल्कासह आयकर लागू करण्यात आला. त्यामुळे हा दिवस आयकर दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो.

1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश राजवटीला झालेल्या नुकसानीची भरपाई करणे हा या कराचा मुख्य उद्देश होता. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आयकराचा मुख्य वापर महसूल आणि सरकारी तिजोरी वाढवण्यासाठी केला गेला.

  • आयकर म्हणजे काय?

आयकर हा एक प्रकारचा कर आहे. जो भारत सरकार लोकांच्या उत्पन्नावर लादतो. भारत सरकार कराच्या कक्षेत येणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाचा एक छोटासा भाग कर म्हणून गोळा करते.

या कराच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम सरकार सामान्य कामांसाठी आणि जनतेच्या सेवेसाठी वापर असते.

  • पहिला आयकर दिवस कसा साजरा केला गेला?

2010 मध्ये पहिल्यांदा देशात राष्ट्रीय आयकर दिन साजरा करण्यात आला. यादरम्यान देशाचे तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष प्रसंगी देशात टपाल तिकिटे आणि नाणीही जारी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT