Beauty Tips Nail Paint Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nail Paint: बोटांची नेलपॉलिश लवकर निघत निघत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

Nail Paint Care Tips: तुमच्याही नखांवरून नेलपॉलिश लवकर निघू नये असे तुम्हाला वाटत असेल तर पुढील गोष्टी नक्की ट्राय करू शकता.

Puja Bonkile

nail paint how to keep nail paint long lasting read full story

सर्वच महिला हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखांना नेलपॉलिश लावतात. पण कधी कधी असे घडते की नेलपॉलिश लावल्यानंतर काही वेळाने ते निघून जाते.

पार्टी असो वा कार्यक्रम, जेव्हा हे अनेकवेळा घडते, तेव्हा ही समस्या कशी सोडवायची हे समजू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या नखांवर नेलपॉलिश जास्त वेळ टिकून राहावी असे वाटत असेल तर पुढील ट्रिक वापरू शकता.

नेलपॉलिश लावण्यापूर्वी हे काम करू नका

अनेक महिला जेव्हाही नखांवर नेलपॉलिश लावतात तेव्हा हात स्वच्छ धुतात, पण असे करू नका. नखांवर नेलपॉलिश लावताना असे केल्याने नखांवर नेलपॉलिश चांगली सुकते आणि त्यामुळे नेलपॉलिश लवकर निघून जाते.

अशा प्रकारे लावा नेलपॉलिश

नेलपॉलिश लावताना नेहमी नेलपॉलिश वरपासून खालपर्यंत लावावी. असे केल्याने नेलपॉलिशचा रंग बराच काळ टिकतो. तसेच चांगल्या क्वॉलिटीची नेलपेंट वापरावी.

पातळ थर लावावा

नेलपॉलिश जास्त वेळ टिकून ठेवण्यासाठी एका कोटमध्ये नेलपॉलिशचा पातळ थर लावावा. कारण नखांवर नेलपॉलिशचे जास्त थर लावल्यास जास्त वेळ टिकत नाही. तसेच जर तुम्ही नेलपॉलिशचे दोन ते तीन कोट लावत असाल तर लक्षात ठेवा की एक कोरडे झाल्यानंतरच दुसरा कोट लावा. नाहीतर तुमची नेलपॉलिश नीट दिसणार नाही.

बेस कोट लावणे गरजेचे

नेलपॉलिश नखांवर जास्त वेळ टिकून राहावी असे वाटत असेल तर सर्वात पहिले बेस कोट लावा. बेस कोट लावल्याने नेलपॉलिश नखांना चांगले चिकटते आणि बराच वेळ टिकते. यामुळे तुम्हाला वारंवार नेलपॉलिश लावण्याची गरज पडत नाही.

नीट सुकवा

नेलपॉलिश लावल्यावर नीट सुकवावे. जर तुम्ही अर्धवट नेलपॉलिश लावून कोणते काम केले तर ते खराब किंवा निघून जावू शकते. यामुळे नेलपॉलिश नीट सुकल्यानंतरच काम करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT