Nail Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Nail Care Tips: 'या' घरगुती उपायांनी पायाची नखे होतील मजबुत

Nail Care Tips: पायाच्या नखांची योग्य काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.

Puja Bonkile

nail care tips foot how to take care of nails home remedies

सर्वजण चेहऱ्याची आणि हातांच्या त्वचेची जितकी काळजी घेतात तितकी पायांची काळजी घेत नाही. विशेषतः आपण अनेकदा पायाच्या नखांकडे दुर्लक्ष करतो. ते कोरडे, खडबडीत आणि निर्जीव दिसतात. त्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते अन्यथा ते खराब तर होतातच पण संसर्गही होतो. त्यामुळे पायाची नखं व्यवस्थित स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पायाची नखे मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करू शकता.

पाण्यात पाय भिजवा 

एक लहान आणि खोल भांडे घ्या आणि त्यात पाणी भरा. पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करा. तसेच थोडे मीठ घालावे. यानंतर, या मिश्रणात तुमच्या पायाची नखे 5 ते 10 मिनिटे बुडवून ठेवावे. यामुळे नखांमध्ये अडकलेली घाण काढणे सोपे होते. 10 मिनिटांनंतर, नखांच्या आत साचलेली घाण नेल क्लिनिंग टूलच्या मदतीने साफ करावी. 

नखे स्वच्छ करा 

सर्वात पहिले तुम्ही चांगल्या ब्रँडचे नेल पेंट रिमूव्हर वापरून नखे स्वच्छ करावी. याशिवाय इतर कोणतीही वस्तू वापरून नेल पेंट काढू नका. यामुळे तुमची नखे खडबडीत आणि कोरडी होतात. 

नेल पॅक लावा 

नखे स्वच्छ झाल्यावर त्यावर नेल पॅक लावा. तुम्हाला मार्केटमध्ये अनेक चांगल्या ब्रँडचे नेल पॅक मिळतील, पण तुम्ही ते घरीही बनवू शकता. यासाठी 1 चमचा ओट्स पावडर घ्या आणि त्यात दही मिक्स करा. हे मिश्रण पायाच्या नखांवर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी नखे स्वच्छ करा. यामुळे तुमच्या नखांना चमक येईल. 

मृत त्वचा काढून टाका 

नखांभोवतीची मृत त्वचा काढून टाकणे देखील महत्त्वाचे आहे. यामुळे कोणतेहा संसर्ग होणार नाही.

नखे कापून आकार द्या 

नेल कटरने नखे कापून त्यांना चांगला आकार द्या. यामुळे तुमचे नखे आणखी सुंदर दिसतील. यासोबतच नखे फाईलरच्या साहाय्याने फाईल करा, जेणेकरून त्यांचा खडबडीतपणा दूर होईल. 

नखांच्या क्युटिकल्सची मालिश करा 

तुमची नखे फाईल झाल्यानंतर, तुमच्या नखांना ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. 2 ते 5 मिनिटे मालिश केल्यानंतर, नखांना 10 मिनिटे तसेच ठेवा. यानंतर तुम्हाला तुमच्या पायाची नखे खूप चमकताना दिसतील. 

नेल पेंट लावा 

.तुमच्या पायाच्या नखांवर तुमच्या आवडीचे नेल पेंट लावा. अशाप्रकारे, वर नमूद केलेली प्रक्रिया दर 10 दिवसांनी एकदा पुन्हा करा. यामुळे पायंची नखे चांगले राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: एलईडी मासेमारी आणि बुल ट्रॉलिंगवर कारवाई करण्यासाठी एक संयुक्त यंत्रणा तयार

Illegal Gambling: गोव्याच्या कॅसिनोत मोठी कारवाई! 11 जणांना अटक; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT