Museum Of Goa Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चित्र प्रवासाची वेधक कहाणी

Museum Of Goa: निल रेलिया यांचे ‘माझा प्रवास’ या विषयावरचे व्याख्यान गोव्यात आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

स्कीन प्रिंटिंगपासून सुरू करून, भारतातील सर्वात मोठा चित्र संग्राहक बनलेल्या अनिल रेलिया यांचे ‘माझा प्रवास’ या विषयावरचे व्याख्यान येत्या रविवारी सकाळी 11:30 वाजता येथील ‘म्युझियम ऑफ गोवा’ (Museum Of Goa) मध्ये आयोजित करण्यात आले आहे.

बडोदा येथील एम. एस. विद्यापीठातून फाईन आर्टची पदवी मिळवल्यानंतर अनिल रेलिया यांनी अहमदाबाद येथे स्वतःचा एक छोटा ग्राफिक स्टुडिओ- ‘आर्चर’ या नावाने सुरू केला. त्यानंतर त्यांची भेट भारताचे प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांच्याशी झाली.

हुसेन यांच्या सेरिग्राफ सिरीजवर अनिल यानी काम केले. हुसेनना त्यांचे काम खूप आवडले आणि त्यांनी आपली अनेक सेरिग्राफिक सिरीज अनिलबरोबर केली. अनिल यांचे कौशल्य पाहून हुसेननी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ बनवण्याचा व भारतातील ज्येष्ठ आणि सर्वोत्तम चित्रकारांबरोबर (Paint) काम करण्याचा आग्रह केला

‘आर्चर’ आता भारतातील (India) सर्वात मोठा ग्राफिक्स स्टुडिओ आहे. ‘मास्टर’ चित्रकारांबरोबर मिळून त्यांनी प्रसिद्ध ग्राफिक कलानिर्मिती केली आहे. या रविवारी अनिल रेलिया या ‘मास्टर्स’ बरोबरच्या आपल्या प्रवासाची कहाणी आपल्या व्याख्यानातून उलगडतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

SCROLL FOR NEXT