Muscle Pain In Winter Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Muscle Pain In Winter: हिवाळ्यात या कारणांमुळे स्नायूंमध्ये होतात वेदना

थंडीच्या दिवसांमध्ये स्नायूमध्ये वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Muscle Pain In Winter: थंडीचा हंगाम सुरू होताच सांध्याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला स्नायूंमध्ये तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विकारांमुळे हे अनेकदा घडते. परंतु थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात वेदना वाढण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. खरं तर हिवाळ्यात हवा थंड झाल्यावर वातावरणातील बॅरोमेट्रिक दाब वाढतो, ज्यामुळे मणक्याचे आणि मज्जातंतूंवर दबाव निर्माण होतो. ज्यामुळे स्नायू आणि हाडांमध्ये वेदना वाढते. चला जाणून घेऊया सर्दीमध्ये स्नायू दुखणे का वाढते आणि थंडीत स्नायू दुखणे कसे दूर करावे.

  • स्नायू दुखण्याचे कारण काय आहे 

थंडीमुळे सांध्यांवर दबाव येतो आणि त्यामुळे सांधेदुखीची सारख्या समस्या निर्माण होतात. जसजशी थंडी वाढते तसतसे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होऊ लागते आणि ते मंद होते. त्यामुळे स्नायू आणि नसांमध्ये कडकपणाची समस्या सुरू होते. त्याच वेळी हाडांचे दुखणे देखील वेळोवेळी वाढते, जे मधूनमधून जाणवते. याशिवाय हिवाळ्यात स्नायू कडक होण्यामागील एक कारण म्हणजे स्नायू आकुंचन किंवा स्नायू आकुंचन पावतात. ज्यामुळे स्नायू दुखणे वाढू लागते.

  • वजन नियंत्रणात ठेवावे

हिवाळ्यात जास्त तळलेले पदार्थ खाण्यात येतात. यामुळे वजन वाढू शकते. तस्याच हिवाळ्यात लोक तितके व्यायम देखील करत नाही. ज्यामुळे लोकांचे वजन वाढते, त्यामुळे स्नायू दुखण्याची समस्या सुरू होते. त्यामुळे चरबीयुक्त पदार्थ आणि जास्त कर्बोदकांचे सेवन टाळावे आणि हिरव्या भाज्या आणि फळे खावे. जेवल्यानंतर कोमट पाणी प्यावे. यामुळे रक्ताभिसरण वाढेल, आणि स्नायूंचे दुखणे कमी होते. 

  • स्ट्रेचिंग किंवा व्यायाम 

स्नायूंचे दुखणे टाळण्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही सकाळी चहा पिण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे व्यायाम करू शकता. यामुळे स्नायू आणि हाडांची हालचाल सुधारते.यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि नंतर स्नायूंमध्ये वेदना कमी जाणवते.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मेरी जान को खतरा है! गोवा माईल्सच्या चालकाने येण्यास दिला नकार, पर्यटकाला करावी लागली 1 km पायपीट; आणखी एका महिलेला आला धक्कादायक अनुभव Watch Video

Goa: किती ‘एमएसएम’, स्टार्टअप बंद पडले याची माहिती जनतेला द्या! प्रतीक्षा खलप यांची मागणी; GST उत्सवावर केली टीका

Pinak Silat Championship: गोव्याची जोरदार कामगिरी! पिनाक सिलट संघाने मिळविली 12 पदके; 1 सुवर्ण, 3 रौप्यचा समावेश

Curti: अचानक विजेचा दाब वाढला, उपकेंद्रात झाला स्फोट; ऐन दसऱ्यादिवशी कुर्टीत गोंधळ; कर्मचाऱ्यांकडून तासाभरात वीजपुरवठा सुरळीत

Dudhsagar Tourism: 'जीप टुर असोसिएशनच्या सर्व मागण्या पूर्ण होणार'! तेंडुलकरांचे ठाम वक्तव्य; दूधसागर पर्यटन हंगामाला प्रारंभ

SCROLL FOR NEXT