Morning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Tips: सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही तासंतास बेडवर पडून राहाव वाटतं का?

Morning Healthy Tips: अनेक लोक सकाळी उठताना खुप आळस करतात आणि बराच वेळ बेडवर झोपून राहतात. असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Puja Bonkile

Morning Tips after wake up morning you also lie on bed long time harmful for health

सकाळी साखर झोप सर्वांनाच आवडते. अनेकांना सकाळी उठल्यानंतरही अंथरुणावर पडून राहणे आवडते. असे केल्याने आपल्या शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का?

सकाळी बेडवर उठल्यानंतरही पडून राहील्याने अनेक नुकसान होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर बेडवर पडणे ही एक सामान्य समस्या आहे, जी बऱ्याच लोकांमध्ये दिसून येते. असे केल्याने तुम्हाला लठ्ठपणासारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. असे केल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

बेडवर खुपवेळ पडून राहणे धोकादायक

बेडवर पडून राहिल्याने आपल्या पाठीत दुखू शकते. तसेच आपल्या स्नायूंना त्रास होऊ शकतो. याशिवाय, त्याचा आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. बराच वेळ अंथरुणावर पडून राहिल्याने थकवा आणि आळसपणा जाणवतो.

याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो आणि आपल्याला उर्जेची कमतरता जाणवते. सहसा ही समस्या सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी उद्भवते. सकाळी उठल्यानंतर अनेक तास बेडवर पडून राहण्याची झोप न लागणे, आळस, मानसिक ताण, आरोग्य समस्या यासारख्या अनेक कारणे असू शकतात.

या समस्येवर उपाय कोणते

बेडवर जास्तवेळ पडून राहिल्याने अस्वस्थ वाटते. तसेच आरोग्याशी संबंधित अनेक आजार निर्माण होऊ शकतात. यापासून बचाव करण्यासाठी सकाळी लवकर उठून अलार्म लावण्याची सवय लावावी. याशिवाय सूर्यप्रकाशाकडे लक्ष द्या आणि व्यायाम करावा. रोज रात्री झोपण्याची निश्चित वेळ ठरवावी. तसेच एकाच जागी झोपावे. असे केल्याने आजारांपासून सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते.

झोपण्यापूर्वी मोबाइल,लॅपटॉप यासारखे उपकरणे तुमच्यापासून दूर ठेवा आणि बेड स्वच्छ करावा. या उपायांनंतरही जर तुम्हाला सकाळी उठण्यास त्रास होत असेल किंवा झोपेची समस्या येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT