Types Of Tea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Drink: चहा ऐवजी हे पेय काही दिवस करा ट्राय, मिळतील अनेक फायदे

वर्षानुवर्षे सकाळचा चहा पिऊन कंटाळा आला असेल तर या हिवाळ्यात हे खास पेय ट्राय करा.

दैनिक गोमन्तक

हिवाळा येताच असे अनेक पदार्थ असतात. ज्यांचे सेवन अधिक होते. भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर हिरव्या पालेभाज्या भरपूर खाल्ल्या जातात. त्याचप्रमाणे थंडीच्या मोसमात गुळाचे सेवनही वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. गुळाचा तापमानवाढीचा प्रभाव असतो, जो पचन आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. गुळातील पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस, तांबे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात जी शरीरासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला रोज चहा पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही काही दिवस गुळाचे पेय ट्राय करु शकता.

हिवाळ्यात सकाळी लवकर कोमट पाणी गुळासोबत प्यायल्याने त्वरित ऊर्जा मिळते. यासोबतच पचनापासून ते रक्तदाबापर्यंत अनेक गोष्टींमध्ये मदत होते. गुळाचे पेय कसे बनवायचे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर त्याचेही उत्तर आमच्याकडे आहे.

  • गुळाचे पेय कसे बनवायचे

सर्व प्रथम एका कढईत एक ग्लास पाणी गरम करून त्यात 1 इंच गुळाचा तुकडा टाका, आता 
चमच्याने हलवा म्हणजे गूळ वितळेल.

  • थंड झाल्यावर गाळून प्या 

तुम्हाला हवे असल्यास गूळ पावडर थेट गरम पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. हे सकाळचे पेय म्हणून काम करेल आणि चहाची (Tea) सवय बदलून तुम्हाला नवीन चव देईल. 

  • फायदे एकापेक्षा जास्त आहेत

हाडे मजबूत ठेवते 

हिवाळ्याच्या (Winter) हंगामात, आपण अनेकदा लोकांचे म्हणणे ऐकले असेल की त्यांची हाडे आणि सांधे दुखू लागले आहेत. गुळाचे सेवन केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. तसेच सांधेदुखीसारखे हाडांचे आजार दूर करून शरीराला आराम मिळतो. कारण गुळात पोटॅशियम आणि सोडियम जास्त प्रमाणात आढळते. कोमट पाण्यात गुळाचे सेवन केल्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो.

लोहाची कमतरता दूर करते 

जर तुमची हिमोग्लोबिन पातळी कमी असेल तर गरम पाण्यात गुळाचे सेवन केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. गुळात भरपूर प्रमाणात लोह आणि फोलेट असते ज्यामुळे शरीरात आरबीसीचे प्रमाण वाढते. गरोदरपणात ज्या महिलांना अॅनिमियाचा त्रास होतो, त्याही गुळाचे सेवन करू शकतात.

डिटॉक्स

गुळात असे गुणधर्म आढळतात जे शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करतात. हे आपले रक्त शुद्ध आणि यकृत शुद्ध ठेवते. जर तुम्ही दररोज मर्यादित प्रमाणात गरम पाण्यात गुळाचे सेवन केले तर त्यामुळे हिवाळ्यात तुमची त्वचा चमकते आणि शरीर निरोगी राहते. 

इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते 

गुळात भरपूर पोटॅशियम असते जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. इलेक्ट्रोलाइटच्या संतुलनामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते आणि शरीरातील आम्ल व बेस यांचे संतुलनही राखले जाते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा

तसेच हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या जेवणाची विशेष काळजी घ्यावी लागते. मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, B6 आणि C चा चांगला स्रोत. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. दररोज सकाळी मर्यादित प्रमाणात याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT