धावपळीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आहारात योग्य आणि पोषक पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. अनेकांना जेवणाक मीठ (Salt) अधिक खाण्याची सवय असते. यामुले आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार असलेल्या लोकांना मीठाचे सेवन कमी करावे. चला तर मग जाणून घ्या कमी मीठ खाण्याची अशी 7 कारणे, ज्याचा तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
अनेक संशोधनांनुसार सिद्ध झाले की, आहारात (Diet) मीठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. यामुळे धमन्या, हृदय (Heart) आणि रक्तवाहिन्यांचे दीर्घकाळ नुकसान होऊ शकते. आहारात मीठ कमी ठेवल्याने रक्तदाब तर नियंत्रणात राहतोच, पण हृदयाचे आरोग्यही सुधारते.
हृदयविकाराचा धोका कमी
मीठाचे कमी सेवन केल्याने रक्तदाब नियत्रंणात राहतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशीत झालेल्या अभ्यासानुसार, असे आढळून आले की प्रीहायपरटेन्शन असलेल्या लोकांमध्ये जे लोक आहारात मीठाचे कमी सेवन करतात त्यांना ह्रदयविकारांचा धोका कमी होतो.
पोट फुगण्याची समस्या दुर
तुम्ही जेवणात जितके कमी मीठ वापरला तितकी पचनशक्ती चांगली राहिल. कारण अधिक मीठ खाल्ल्याने पेशींमध्ये पाणी टिकून राहते. यामुळे पोट तर फुगतेच पण चेहराही फुगायला लागतो. शरीरावरील सुज कमी करायची असेल तर मीठाचे सेवन कमी करावे.
कर्करोगाचा धोका कमी
संशोधनात असे दिसून आले की आहारात मीठाचे सेवन अधिक केल्यास कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. मिठाच्या अतिसेवनाने पोटाच्या आतील आवरणाला इजा होऊ शकते. यामुळे मीठाचे सेवन कमी करावे.
हाडांचे आरोग्य सुधारते
कॅल्शियम आपल्या शरीरातून युरिनद्वारे काढून टाकले जाते आणि किती कॅल्शियम सोडले जाईल हे आपल्या शरीरातील सोडियमच्या प्रमाणावर अवलंबून असते. आहारात मीठ जास्त प्रमाणात घेतल्यास युरिनमधून जास्त प्रमाणात कॅल्शियम बाहेर पडते. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.यामुळे मीठाचे सेवन कमी करावे.
मूत्रपिंडाचे कार्य वाढवते
जे लोक जास्त मीठ खातात, त्यांच्या किडनीला (Kidney) शरीरातून मीठ काढून टाकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे युरीनद्वारे जास्त कॅल्शियमही बाहेर काढले जाते. यामुळे किडनी स्टोन आणि किडनीचे इतर आजार होऊ शकतात.
मेंदूच्या आरोग्य
मिठाच्या अतिसेवनामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. मेंदूला (Brain) रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या ब्लॉक किंवा अरुंद होतात. ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. तसेच ते ऑक्सिडेटिव्ह तणाव (Stress) आणि रक्तदाब देखील वाढवते, ज्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.