Morning Breakfast Food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast Food: सकाळी 10- 15 मिनिटांमध्ये बनवता येतो हा ब्रेकफास्ट, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्तात झटपट तयार होणारे आणि पोषक असे पदार्थ वाचा एका क्लिकवर

Puja Bonkile

Morning Breakfast Food: सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रत्येक जण हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतो. ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांची सकाळी कामांची खूप अवघड असते. त्यामुळे अनेकदा त्या नाश्ता स्किप करतात.

हे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. नाश्ता हे सकाळचे पहिले मील आहे. रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या नाश्त्यामध्ये खूप अंतर असतो. त्यामुळे ते स्किप करणे टाळावे. जर तुमच्याकडे सकाळी खूप वेळ नसेल तर तुम्ही हे पदार्थ ट्राय करू शकता.

  • व्हेजिटेबल इडली

तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये व्हेजिटेबल इडली देखील देऊ शकता. हे बनवण्यासाठी खुप सोपे आहे. रव्यामध्ये दही आणि मीठ मिक्स करून बॅटर तयार करावे. नंतर त्यात सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, स्वीट कॉर्न यांसारख्या भाज्या घालून मिक्स करावे. या मिश्रणात थोडासे बेकिंग सोडा घालावे आणि नंतर इडली स्टँडमध्ये पाणी गरम करावे. स्टँडमध्ये इडलीचे पीठ भरून वाफवून घ्या. 7 ते 10 मिनिटांत बाहेर काढावे.

  • डाळींचा चिला

सकाळी नाश्त्यात तुम्हा डाळींचा चिला तयार करू शकता. डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात. अशावेळी तुम्ही कोणतीही डाळ भिजवून बारीक करू शकता आणि नंतर त्यापासून चीला बनवू शकता. डाळ बारीक करण्यासोबतच त्यात आले, हिरवी मिरची टाकू शकता. तसेच त्यात फिलिंग म्हणून तुम्ही त्यात पनीर आणि कांद्याचे मिश्रण घालू शकता.

  • फळे आणि ओट्स

ओट्स हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे शिजवण्याची पद्धत वेगळी आहे. लठ्ठपणा कमी करणाऱ्या लोकांनी ओट्स पाण्यात उकळून घ्यावेत.

चांगले उकळून सर्व पाणी सुकले की एका भांड्यात घ्या. नंतर काही फळे कापून त्यात टाका. यासोबत सफरचंद, आंबा, केळी, स्ट्रॉबेरी हे चांगले लागते. तुम्ही यात भोपळ्याच्या बिया आणि चिया सीड्स देखील घालून खाऊ शकता. गोडव्यासाठी तुम्ही त्यात साखर किंवा मध घालू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT