Morning Breakfast Cabbage-Chana-Dal Tikki Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast Tikki Recipe: सकाळच्या नाश्त्यात घ्या चणा-डाळ कोबी टिक्कीचा आस्वाद, नोट करा रेसिपी

रोज एकच प्रकारचा नाश्ता करून कंटाळा आलाय मग ही रिसिपी नक्की ट्राय करा.

Puja Bonkile

Cabbage-Chana-Dal Tikki Recipe: सकाळच्या नाश्तामध्ये पाहे, उपीट खाऊन बोर झाले असाल तर तुम्ही कोबीपासून टिक्की बनवु शकता. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे.

तसेच आरोग्यदायी देखील आहे. चणा डाळ-कोबी टिक्की केवळ नाश्त्यासाठी योग्य डिश नाही तर ती दिवसा किंवा संध्याकाळीच्या चहासोबत आस्वाद घेऊ शकता.

  • चणा डाळ-कोबी टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भिजवलेली चणा डाळ - 1कप

कोबी बारीक चिरून - 1/2 कप

बेसन - 1/4 कप

दही - 2 टेस्पून

हळद - 1/4 टीस्पून

जिरे पावडर - 1/5 टीस्पून

हिरवी मिरची - 1 टीस्पून

पुदिन्याची पाने - 2 टेस्पून

तेल - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

  • चणा डाळ कोबी टिक्की बनवण्याची कृती

चणा डाळ कोबी टिक्की बनवण्यासाठी सर्वात पहिले चणा डाळ स्वच्छ करा आणि 4/5 तास पाण्यात भिजत ठेवावी. ठरलेल्या वेळेनंतर डाळ गाळून पाणी काढावे.

नंतर कोबी, पुदिना आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. यानंतर भिजवलेली चणाडाळ मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे.

नंतर या डाळीच्या पेस्टमध्ये बारीक चिरलेली कोबी, पुदिन्याची पाने, हळद, जिरेपूड घालून सर्वकाही चांगले मिक्स करा.

यानंतर पेस्टमध्ये बेसन, दही आणि चवीनुसार मीठ मिक्स करावे. आता थोडी पेस्ट हातात घेऊन प्रथम त्यातून एक गोल गोळा बनवा आणि नंतर त्याला चपटा करून टिक्कीचा आकार द्या.

आता नॉनस्टिक तव्यावर मध्यम आचेवर गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाकून पसरवा. आता तयार टिक्की तव्यावर ठेवा आणि भाजून घ्या.

काही वेळाने टिक्कीच्या कडांवर तेल टाकून टिक्की उलटा करून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी झाल्यावर प्लेटमध्ये काढा.

त्याचप्रमाणे सर्व चणा डाळ-कोबी टिक्की तयार करा. शेवटी पौष्टिक टिक्की हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT