Morning Breakfast Apple Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Apple Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी सफरचंद ब्रेड रोल!

सफरचंद ब्रेड रोल नाश्त्यातच नाही तर मुलांच्या जेवणाच्या डब्यात देण्यासाठी बेस्ट आहे.

दैनिक गोमन्तक

Apple Morning Breakfast Recipe: बर्‍याच लोकांना त्यांचा नाश्ता हेल्दी पण त्याचवेळी चवीने परिपूर्ण हवा असतो. तुम्ही सफरचंद वापरून तयार केलेला ब्रेड रोल नाश्त्यात बनवू शकता. ही एक हेल्दी रेसिपी आहे.

सफरचंद ब्रेड रोल अगदी कमी साहित्यासह सहजपणे तयार केला जाऊ शकतो. हा ब्रेड बनवायला जास्त वेळ लागत नाही. जर तुम्ही आत्तापर्यंत सफरचंद ब्रेड रोलची रेसिपी घरी करून पाहिली नसेल, तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज बनवू शकता.

सफरचंद ब्रेड रोल मुलांच्या जेवणाच्या डब्यासाठी देखील एक उत्तम खाद्यपदार्थ असू शकतो. चला जाणून घेऊया सफरचंद ब्रेड रोल बनवण्याची रेसिपी.

सफरचंद ब्रेड रोलसाठी लागणारे साहित्य

ब्रेड स्लाइस - 6

सफरचंद (बारीक चिरून) - 4 कप

साखर - 1/2 कप

मेल्टेड बटर - 4 टेस्पून

दालचिनी पावडर - 1 टीस्पून

जायफळ पावडर - 1/4 टीस्पून

लिंबाचा रस - 1 टीस्पून

  • सफरचंद ब्रेड रोल बनवण्याची कृती

सफरचंद ब्रेड रोल बनवण्यासाठी सर्वात पहिले सफरचंद पाण्याने धुवावे. यानंतर सफरचंदाचे बारीक तुकडे करावे. नतंर एका कढईत बटर घालून मध्यम आचेवर गरम करा. बटर वितळल्यानंतर त्यात सफरचंदाचे तुकडे टाकून शिजवा.

थोड्या वेळाने कढईत साखर, लिंबाचा रस, दालचिनी पावडर आणि जायफळ पूड टाका आणि मिक्स करा. सफरचंद 2-3 मिनिटे शिजवल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. आता सफरचंद व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवा.

काही वेळाने मिश्रण उकळायला सुरुवात होईल. यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. आता स्टफिंग तयार आहे. हे एका भांड्यात काढून बाजूला ठेवा.

आता ब्रेड स्लाईस घ्या. ब्रेड स्लाइसच्या दोन्ही बाजूंना बटर लावा. यानंतर, ब्रेड स्लाइसवर 2-3 चमचे बनवलेले स्टफिंग घालून पसरवा. यानंतर ब्रेड स्लाइस फोल्ड करून रोल तयार करा. त्याचप्रमाणे एक एक करून सफरचंद ब्रेड रोल बनवा.

आता सफरचंद ब्रेड रोल मध्यम आचेवर ग्रील करा. याआधी प्रत्येक रोलच्या वरच्या बाजूला बटर लावा. रोलचा रंग सोनेरी तपकिरी होईपर्यंत ग्रील करावे. आता चविष्ट आणि हेल्दी सफरचंद ब्रेड रोल नाश्त्यासाठी तयार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT