Precautionary Measures for Covid: कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय, संरक्षणासाठी लाईफस्टाइलमध्ये करा ‘हे’ बदल!

कोरोनाला परत हरवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे.
Corona Virus:
Corona Virus:Dainik Gomantak
Published on
Updated on

Precautionary Measures for Covid: दोन वर्षापुर्वी (2020) कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले होते. या विषाणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला तर आजही बहुतांश लोक आरोग्याच्या समस्यांशी झगडत आहेत.

2020 पासून आतापर्यंत कोरोनाचे अनेक प्रकार आले आहेत आणि लोकांना संक्रमित केले आहे. आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे अनेक रुग्ण देशात वेगाने वाढत आहे. यामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क (Mask) घालण्याचा सल्ला दिला जात आहे.

या कठीण काळात आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या लाईफस्टाइलमधील काही छोटे बदल तुमचा कोरोनापासुन बचाव करु शकतात.

  • मास्क घालावा

जेव्हा तुम्ही घराबाहेर जात असाल किंवा सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर मास्क घालणे गरजेचे आहे.

corona
coronaDainik Gomantak
  • हेल्दी पदार्थ खावे

हेल्दी पदार्थांचे सेवन करणे निरोगी आरोग्यासाठी फायदेसीर असते. जर तुम्ही हेल्दी पदार्थ खाल्ले तर त्यातील पोषक आणि जीवनसत्त्वे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करतील, ज्यामुळे तुमचे शरीर विषारी विषाणूशी लढण्यासाठी तयार होईल.

Healthy Food
Healthy FoodDainik Gomantak
  • पुरेशी घ्यावी

आपल्या शरीराला हेल्दी आणि निरोगी ठेवण्यासाठी पेशींची दुरुस्ती करण्यासाठी, विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमचं शरीर तर निरोगी राहिलच पण मनालाही आराम मिळेल.

sleeping
sleepingDainik Gomantak
  • व्यायम करावा

दिवभरात कधीही वेळ काढुन रोज व्यायाम करावा. यामुळे तणाव, चिंता कमी होते आणि तुमची झोप देखील चांगली होइल. यामुळे आरोग्यही चांगले राहते.

yoga
yoga Dainik Gomantak
  • स्वच्छता राखावी

स्वच्छता राखणे सर्वात महत्वाचे आहे. जेणेकरुन आपण कोरोना विषाणूचा बळी होण्यापासून वाचू शकता. दिवसातून अनेक वेळा आपले हात साबणाने धुवावे. तुम्ही घराबाहेर असाल तर सॅनिटायझचा वापर करावा.तसेच घरातही स्वच्छता ठेवावी.

Cleaning
Cleaning Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com