Dosa  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast Dosa Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा रवा कांदा डोसा

नाश्तासाठी रवा कांदा डोसा एक उत्तम पर्याय आहे.

दैनिक गोमन्तक

Morning Breakfast Dosa Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न महिलांना नेहमीच पडलेला असतो. तुम्ही झटपट तयार होणारा कांदा रवा डोसा बनवु शकता.

तुम्ही जर मसाला डोसा, पनीर डोसा इत्यादी डोसाचे अनेक प्रकार डोसा खाउ बोर झाले असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे.

मुलं मोठ्या उत्साहाने कांदा डोसा खातात. रव्यापासून बनवलेला कांदा डोसा कसा बनवायचा चला तर मग जाणून घेउया.

  • रवा कांदा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

रवा - 1 कप

बारीक चिरलेला कांदा - 3

आले चिरून - 1/2 तुकडा

तांदळाचे पीठ - 1 कप

भाजलेले काजू - 3 टीस्पून

हिरवी मिरची चिरलेली - 3

जिरे - 1/4 टीस्पून

हिंग - 1 चिमूटभर

काळी मिरी - 1/2 टीस्पून

मीठ - चवीनुसार

सर्वात पहिले रवा आणि तांदळाचे पीठ एका भांड्यात मिक्स करावे. यानंतर मिश्रणात थोडे पाणी घालून मिक्स करावे.

नंतर हिंग, जिरे आणि चवीनुसार मीठ एकत्र करून भांडे झाकून 2/3 तास ​​गरम जागी ठेवावे.

कांदा, हिरव्या मिरच्या, आले आणि काजूचे बारिक तुकडे करून घ्या.

काही वेळेनंतर मिश्रणाची पेस्ट घ्या आणि त्यात कांदा सोडून सर्व चिरलेल्या गोष्टी घाला आणि चांगले मिक्स करा.

नंतर थोडे थोडे पाणी घालून पातळ पीठ तयार करा. यानंतर नॉनस्टिक पॅन/ग्रिडल घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा.

तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा.

आता डोसा मिश्रण एका भांड्यात घेऊन तव्याच्या मध्यभागी ठेवा आणि गोल आकारात पसरून डोसा बनवा.

डोसा थोडा वेळ भाजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका.

नंतर चमच्याच्या मदतीने डोस्यावर कांदा हलका दाबून 2/3 मिनिटे भाजून घ्या. यानंतर कडांना थोडे तेल लावून परतावे. काही वेळाने डोसा उलटा.

डोसा सोनेरी होईपर्यंत बेक करा.

नंतर दुमडून प्लेटमध्ये काढा. त्याचप्रमाणे सर्व कांदा डोसे तयार करा.

  • वजन नियंत्रणात राहते

डोसा हा चविष्ट आणि संतुलित पदार्थ आहे आणि त्यात कॅलरीजही कमी असतात. हे नॉन-स्टिक बेसमध्ये अगदी कमी तेल किंवा तूप घालून तयार केले जाते, ज्यामुळे ते आणखी आरोग्यदायी बनते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ही डिश तुम्हाला खूप मदत करू शकते.

  • हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

डोसामध्ये कॅलरीज कमी असुन चवही छान असते. डोसे बनवण्यासाठी आपण वापरत असलेल्या घटकांमध्ये कॅल्शियम आणि लोह असते आणि त्यामुळे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी उत्तम असतात. हे शरीराला मजबूत हाडे विकसित करण्यास मदत करते आणि शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेशी ऊर्जा देते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

Viral Post: बंगळूरच्या तरुणाने दिला Cheat Code, गोव्यात टॅक्सी भाड्याचा दर कमी करणारं 'ते' एक वाक्य होतंय व्हायरल!

SCROLL FOR NEXT