सतत Earphones वापरतायं? होउ शकतात 'हे' 4 गंभीर आजार

इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाला संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.
Side Effects Of Earphone
Side Effects Of EarphoneDainik Gomantak

Earphones: आजकाल ऑटो असो की बस, मेट्रो असो की रोड, सगळीकडे तुम्हाला इअरफोन किंवा हेडफोन घातलेले लोक दिसतील. चित्रपट पाहण्यापासून ते तुमची आवडती गाणी ऐकण्यापर्यंत इअरफोन्स हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. 

कधी फोनवर बोलण्यासाठी तर कधी ऑनलाइन क्लासेससाठी इअरफोन्सचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. या सगळ्यामध्ये इयरफोन्स आपल्यासाठी किती हानिकारक आहेत हे आपण विसरलो. इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.

इअरफोनमधून बाहेर पडणारा आवाज कानाच्या पडद्याला जवळून आदळतो, अशावेळी कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. समस्या अधिक वाढल्यास बहिरेपणाचा धोकाही वाढतो. 

गेल्या 10 वर्षात पोर्टेबल इअरफोन्समधून येणार्‍या मोठ्या आवाजातील संगीताचे अनेक परिणाम पाहिले गेले आहेत. लोक हेडफोन तासनतास कानात घालून बसतात. ज्यामुळे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात ही चिंता वाढत आहे. 

हेडफोन किंवा इअरफोनच्या अतिवापरामुळे जगभरातील सुमारे 100 दशलक्ष तरुणांच्या श्रवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.

Side Effects Of Earphone
Menstrual Hygiene Day: मासिक पाळीत पॅडएवजी वापरा 'या' गोष्टी

1. कान दुखणे

जास्त वेळ इअरफोन वापरल्याने कानांवर वाईट परिणाम होतो. यामुळे कानात वेदना होऊ शकतात. ही वेदना तीव्र देखील असू शकते, ज्यामुळे कानात जडपणाची शक्यता वाढते.

2. बहिरेपणा

जास्त वेळ इअरफोन वापरल्याने कानांच्या नसांवर दबाव पडतो. त्यामुळे नसा सूजण्याची शक्यता असते. कंपनामुळे, श्रवण पेशी त्यांची संवेदनशीलता गमावू लागतात आणि अनेक वेळा बहिरेपणा देखील होऊ शकतो.

3. डोकेदुखीचा धोका

दररोज इअरफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणे तुमच्या कानांसाठी हानिकारक असू शकते. यामुळे कानालाच नाही तर मेंदूलाही खूप नुकसान होते. संगीताच्या तीव्र कंपनामुळे आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश असे आजारही होऊ लागतात.

4. कान सुन्न होणे

इयरफोन्सच्या साहाय्याने दीर्घकाळ गाणे ऐकल्याने तुमचे कान सुन्न होऊ शकतात, ज्यामुळे ऐकण्याची क्षमता कालांतराने कमी होऊ शकते. मोठ्या आवाजात गाणे ऐकल्यानेही मानसिक त्रास होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इयरफोनच्या जास्त वापरामुळे कानात टिनिटस होतो, त्यासोबतच चक्कर येणे, झोप न लागणे, डोके आणि कानात दुखणे इत्यादी लक्षणे देखील दिसतात.

  • कोणते उपाय करावे

तुम्हालाही कानाची समस्या टाळायची असेल, तर इअरफोन फक्त गरज असेल तेव्हाच वापरावे.

स्वस्त इअरफोन्सऐवजी चांगल्या दर्जाचे इअरफोन वापरावे.

 इअरफोन्स दिवसातून 60 मिनिटेच वापरावेत, असे डॉक्टरांचे मत आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com