Morning Breakfast Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ब्रेड वडा

सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेडपासून झटपच बनवा स्वादिष्ट पदार्थ

दैनिक गोमन्तक

Morning Breakfast: रोज सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तुम्हाला जर काही तरी नवीन खावेसे वाटत असेल तर तुम्ही ब्रेड वडा तयार करु शकता.

साउथ इंडियन फूड मेदू वडा ऐवजी तुम्ही घरी ब्रेड वडा ट्राय करू शकता. सकाळच्या व्यस्त वेळापत्रकात नाश्त्यात ब्रेड वडा सहज तयार करता येतो. अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात ब्रेडच्या सँडविचने होते.

पण जर तुम्हाला नाश्त्यात थोडासा बदल करायचा असेल तर तुम्ही सँडविचऐवजी ब्रेड वडा करून पाहू शकता. चला जाणून घेऊया ब्रेड वडा बनवण्याची सोपी पद्धत.

  • ब्रेड वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड स्लाइस - 4/5

तांदूळ पीठ - 1/4 कप

रवा - 3 टेस्पून

बटाटे उकडलेले - 1

दही - 1 कप

बारीक चिरलेला कांदा - 1 टेस्पून

हिरवी मिरची चिरलेली - 2

आले पेस्ट - 1/4 टीस्पून

कढीपत्ता - 8/10

कोथिंबीर- 2/3 चमचे

जिरे - 1/2 टीस्पून

काळी मिरी - 1/4 टीस्पून

जिरे - 1/2 टीस्पून

तेल - तळण्यासाठी

मीठ - चवीनुसार

  • ब्रेडवडा बनवण्याची कृती

ब्रेड वडा बनवण्यासाठी सर्वात पहिले ब्रेड स्लाइसचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यावे. नंतर एका भांड्यात ब्रेड क्रंब्स घ्या आणि त्यात तांदळाचे पीठ आणि 3 चमचे रवा घालून चांगले मिक्स करा. यानंतर, उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करा. ब्रेड क्रम्ब्समध्ये मॅश केलेले बटाटे घालून चांगले मिसळा. यानंतर भांड्यात दही, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा.

चांगले मिक्स केल्यानंतर मिश्रणात आल्याची पेस्ट, हिरवी कोथिंबीर आणि चिरलेली कढीपत्ता घालून मिक्स करा. नंतर चवीनुसार जिरे, मिरची आणि मीठ घाला. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून मऊ मिश्रण तयार करा. आता हाताला थोडे तेल लावून तयार मिश्रण थोडे घेऊन वडे बनवा. वडे एका प्लेटमध्ये करून वेगळे ठेवावेत.

आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात वडे टाका आणि तळून घ्यावे. ब्रेडचे वडे परतताना त्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि वडे कुरकुरीत होतात. यानंतर एका प्लेटमध्ये ब्रेड वडे काढा. त्याचप्रमाणे सर्व ब्रेड वडे तळून घ्या. नाश्त्यासाठी चविष्ट ब्रेड वडा तयार आहे. टोमॅटो सॉससह अस्वाद घेउ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT