Morning Breakfast Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Easy Breakfast Ideas: सोप्या अन् झटपट तयार होणाऱ्या 5 रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

दिवसाची सुरुवात करायची असेल तर या झटपट तयार होणाऱ्या रेसिपी नक्की ट्राय करा.

Puja Bonkile

Morning Breakfast: सकाळी नाश्ता करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण रोज सकाळी नाश्त्यात काय बनवावे का प्रश्न महिलांना पडतो. सकाळी झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आज जाणून घेउया.तसेच या रेसिपी आरोग्यदायीही आहेत. असा नाश्ता, जो वजन कमी करण्यासाठी देखील मदत करेल. चला तर मग जाणून घेऊया अशाच चविष्ट आणि सोप्या पदार्थ कसे तयार करावे.

  • ब्रेड उपमा

ब्रेडपासून बनवलेला उपमा पटकन तयार होतो. चविष्ट असण्यासोबतच गव्हाच्या ब्रेडसोबत बनवल्यास ते खूप आरोग्यदायी देखील आहे. त्यासाठी कांदा, टोमॅटो, मसाले हे साहित्य लागतात. कांदा व टोमॅटो परतून झाल्यावर तेल व जिरे, मसाले व मीठ द्यालावे. शेवटी ब्रेडचे तुकडे घाला.

  • रवा इडली

इडली ही लहान मुलांपासुन सर्वांचीच आवडती आहे. जी झटपट बनवता येते. दह्यामध्ये रवा मिसळा आणि थोडा वेळ राहू द्या. आता त्यात आवडत्या भाज्या आणि मीठ टाकल्यावर इडली बनवताना इनो घाला. मऊ इडल्या बनवल्या जातील. तुम्ही सांबार, चटणी किंवा सॉससोबतही खाऊ शकता.

  • कांदा पोहे

कांदा पोहे चवदार आणि पटकन तयार होतात. हे करण्यासाठी तेल आणि मसाला लावल्यानंतर कांदा हलका तळून घ्यावा लागतो. यानंतर त्यात ओले पोहे टाकावे लागतात. मीठ आणि हळद घालून झाकून ठेवा. पोहे चांगले शिजल्यावर हलके तळताना शेंगदाणे भाजून, लिंबाचा रस आणि हिरवी कोथिंबीर घालून खा.

  • मेथी थेपला

मेथी थेपला बनवायला खूप सोपा आहे. यासाठी मेथी बारीक करून बारीक चिरून घ्यावी लागते. गव्हाच्या पिठात मिसळून मळून घ्या. त्यात तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मल्टी ग्रेन पिठात मिक्स करूनही बनवू शकता. तव्यावर भाजावे लागते. यामुळे शरीरातील लोहाची गरजही पूर्ण होते.

  • थालीपीठ

राजगिरा पीठ, उकडलेले बटाटे आणि शेंगदाणे यापासून बनवलेला हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. राजगिरा पिठात उकडलेले बटाटे आणि शेंगदाणे एकत्र करून पीठ तयार करायचे आहे. तव्यावर थोडं तूप किंवा लोणी लावून चीला सारखे बनवा. चविष्ट असण्यासोबतच पोटही भरल्यासारखे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT