Throat Infection in Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Throat Infection in Monsoon: घशाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी हे उपाय ठरतील रामबाण

पावसाळ्यात वातावरणामुळे संसर्ग वाढतात. यामुळे घसादुखीची समस्या वाढू शकते.

Puja Bonkile

Throat Infection in Monsoon: पावसाळ्यात जंतुसंसर्ग आणि बॅक्टेरियामुळे घशाच्या संसर्ग होणे सामान्य आहे. या दिवसांमध्ये आर्द्रता अधिक असते आणि पावसाळ्यात बॅक्टेरियाची वाढ अधिक वेगाने होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशावेळी ताप, सर्दी, खोकला सोबतच घशाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात घशाच्या संसर्गापासून कसे दूर राहावे हे जाणून घेऊया.

  • पावसाळ्यात घशाच्या संसर्गावर उपाय   

पावसाळ्यात हवा, अन्न, पाणी हवेच्या माध्यमातून घशात जातात. यामुळे घसा खवखवणे, जळजळ होणे, सूज येणे यासारख्या समस्या जाणवतात. काहीही खाताना आणि गिळताना घसा दुखू लागतो. अशावेळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध मिक्स करून प्यायल्याने घशाच्या संसर्ग कमी होतो. मधामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि गरम पाण्याच्या मदतीने सूज दूर होते. 

घशातील सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी आलं किंवा सुंठ पावडर पाण्यात टाकून सेवन करू शकता. यामुळे तुमच्या घशातील संसर्ग लवकर बरा होईल.

तसेच आल्याचा चहा बनवून पिऊ शकता. यामुळे घशाला आराम मिळेल. घसा दुखत असेल तर आल्याचा छोटा तुकडा घेऊन तोंडात टाका आणि हळू हळू चघळत रहावे. यामुळे घशाच्या दुखण्यामध्ये बराच आराम मिळेल आणि घशातील संसर्गास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया देखील नष्ट होतील. 

घशाच्या संसर्गापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे मिठाच्या पाण्याने गार्गल करणे. यामुळे तुमच्या घशातील सूज आणि जळजळ तर कमी होईलच पण घशात संसर्ग होणा-या बॅक्टेरियापासूनही आराम मिळेल.

पावसाळ्यात राहा फिट आणि फाइन राहण्यासाठी काय करावे

  • कोमट पाणी प्यावे

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिणे फायदेशीर असते. पावसाळ्यात दुषित पाणी पिल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यामुळे घशाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो.

  •  हळदीचे दूध पावसाळ्यात फायदेशीर

हळदीचे दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. कोमट दुधात चिमूटभर हळद मिक्स कगुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे रात्रीची झोप सुधारते आणि वेदना आणि थकवा दूर होतो.

  • फळांचे सेवन

पावसाळ्यात फळांचा आहारात समावेश करावा. फळ खाणे आरोग्यासाटी फायदेशीर असते.फळांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. सफरचंद, संत्री, केळी, पपई यासारखे फळ खावी.

  • लवंग-मिरपूड आणि दालचिनीचा काढा

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा रामबाण उपाय म्हणून काम करतो. पावसात इन्फेक्शनचा धोका खूप वाढतो, अशा वेळी डेकोक्शनचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेला काढा तयार करून प्यावा. यामुळे घसा खवखवणे आणि अशा इतर समस्या दूर होतील आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी मजबूत होईल.

  • तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे

आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aggressive Dogs Ban: रॉटविलर, पिटबुलवर बंदीचा मार्ग मोकळा! विरोधकांचा विरोध झुगारत दोन विधेयकांना मंजुरी

Goa Assembly: 1972च्या सर्व्हेत नोंद असूनसुद्धा बेकायदा राहिलेली घरं आता 'कायदेशीर'; महसूल,पंचायत खात्‍याकडून मिळणार प्रमाणपत्रे; CM सावंतांची घोषणा

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

SCROLL FOR NEXT