Room Freshener Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Room Freshener: पावसाळ्यात घरातील कुबट वास नॅचरली दूर करण्यासाठी घरीच बनवा 'या' 3 तीन प्रकारचे रूम फ्रेशनर

तुम्ही या ३ प्रकारचे रूम फ्रेशनर बनवून घरातील कुबट वास नॅचरली दूर करू शकता.

Puja Bonkile

Room Freshener: पावसाळ्यात घराची साफसफाई करूनही अनेकदा घरात एक विचित्र वास येतो. जे सर्व पद्धती वापरूनही सहजासहजी जात नाही. घरातून येणारा वास दूर करण्यासाठीही अनेकजण रूम फ्रेशनरचा वापर करतात. पण हे रूम फ्रेशनर केमिकलयुक्त असून महाग देखील असतात. यामुळे तुम्ही या ३ प्रकारचे रूम फ्रेशनर बनवून घरातील कुबट वास नॅचरली दूर करू शकता.

बाजारात उपलब्ध असलेले रूम फ्रेशनर खूप महाग असतात. जे दररोज वापरणे परवडणारे नसते. तुम्हाला हवे असल्यास काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही घरच्या घरी रुम फ्रेशनर बनवू शकता.

पावसाळ्यात जे घराची शोभा वाढवण्यात चांगली भूमिका तर बजावेलच पण त्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि ते नैसर्गिकही असेल. चला तर मग जाणून घेऊया घरी रुम फ्रेशनर कसा बनवायचा.

Medicine Flowers
  • फुलांपासून बनवा रूम फ्रेशनर

तुम्ही बागेत लावलेल्या फुलांचा वापर रूम फ्रेशनर बनवण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्ही गुलाब किंवा मोगऱ्याची फुले वापरू शकता. रूम फ्रेशनर बनवण्यासाठी सर्वात पहिले एका पातेल्यात पाणी घ्या. नंतर गुलाबाची किंवा मोगऱ्याची फुले धुवून कढईत टाकून गॅस चालू करा. दहा मिनिटे उकळा, त्यानंतर गॅस बंद करा. आता हे पाणी थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवा. ते थंड झाल्यावर ते गाळून स्प्रे बाटलीत भरून आवश्यकतेनुसार खोलीत फवारावे. यामुळे तुमच्या घराला काही मिनिटांतच चांगला वास येऊ लागेल.

essential oils
  • इसेंशियल तेलापासून रूम फ्रेशनर

तुम्ही रुम फ्रेशनर तयार करण्यासाठी आवश्यक तेल देखील वापरू शकता. यासाठी रोझमेरी, टी ट्री, चमेली किंवा लॅव्हेंडर ऑइलमध्ये तुम्हाला हवे असलेले सुगंध पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. पावसाळ्यात घरात येणार कुबट वास कमी होतो. यामुळे तुमच्या घराला नैसर्गिकरीत्या वास येऊ लागेल. घराला सुगंधी बनवण्यासाठी तुम्ही दररोज याचा वापर करू शकता.

Cinnamomum Cassia
  • लवंग-दालचिनी रूम फ्रेशनर

नैसर्गिक रूम फ्रेशनर बनवण्यासाठी तुम्ही लवंग आणि दालचिनीसारखे मसाले देखील वापरू शकता. यासाठी पाण्यात लवंग आणि दालचिनी टाका आणि हे पाणी काही वेळ उकळत ठेवा. नंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या आणि ते थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत ठेवावे. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातून येणारा दुर्गंध दूर करायचा असेल तेव्हा या पाण्याने घरभर फवारणी करा. यामुळे घरातील वास काही मिनिटांतच निघून जाईल.

  • पावसाळ्यात कपड्यांचा येणार कुबट वास कसा दूर कराल

कपडे सुखवण्यासाठी पंख्याचा वापर करावा.

पंख्याखाली कपडे सुकण्यास ठेवा.

याकरता हँगरचा वापर करा.

यामुळे कपडे लवकर सुकण्यास मदत होते.

तसेच एकाद्या मोकळ्या खोलीत कपडे सुकत घालावे.

त्याठिकाणी सुगंधित अगरबत्ती लावावी.

यामुळे कपड्यांचा कुबट वास जाण्यासाठी मदत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT