Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

Goa Police Cyber Crime: सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढ्यात गोवा पोलीसांनी मोठी कामगिरी बजावली असून ते १००% प्रतिसाद दर गाठणारे देशातील पहिले राज्य पोलीस दल ठरले आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढ्यात गोवा पोलीसांनी मोठी कामगिरी बजावली असून ते १००% प्रतिसाद दर गाठणारे देशातील पहिले राज्य पोलीस दल ठरलं आहे. सायबर फसवणुकीसंबंधित गोवा पोलिसांच्या कॉल सेंटरला आतापर्यंत ५,००० पेक्षा अधिक कॉल प्राप्त झाले असून ५८१ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

याशिवाय, १,५०० हून अधिक मिस्ड कॉल्सना यशस्वी प्रतिसाद देत नागरिकांच्या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती सायबर क्राईम विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

गेल्या महिन्यात गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या १९३० या क्लाउड-आधारित कॉल सेंटरमुळे नागरिकांना सायबर फसवणुकीची तक्रार तत्काळ नोंदवण्यासाठी सुरक्षित, सुलभ आणि जलद माध्यम उपलब्ध झाले आहे.

Goa Police
Goa Politics: सरदेसाई यांनी ‘आम्हांला संशय आहे,‘ असे वक्तव्य केले, त्यामुळे आपले मन दुखावले; ॲड. अमित सावंतांचा गौप्यस्फोट

या कॉल सेंटरमध्ये सायबर पोलिस स्टेशनचे नऊ प्रशिक्षित कर्मचारी २४ तास कार्यरत असतात. कॉल सिस्टममध्ये तक्रारदारांचे नाव, क्रमांक, कॉलची वेळ आदी माहिती स्वयंचलितपणे नोंदवल्याने पुढील कार्यवाही अधिक सुलभ झाली आहे.

या नव्या प्रणालीच्या वापरामुळे कॉलची आवाजाची गुणवत्ता वाढली असून प्रत्येक कॉल व्हॉइस रेकॉर्ड केला जात आहे. कॉल रेकॉर्डिंगमुळे सेवा गुणवत्ता, प्रशिक्षण व पुनरावलोकन प्रक्रियेत मोठी मदत होत असल्याचे अधिकारी सांगतात. तक्रारींची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देखील रिअल-टाइममध्ये पर्यवेक्षण केले जाऊ शकते, तसेच आवश्यकतेनुसार कॉन्फरन्स कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.

Goa Police
Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

कॉल सेंटरच्या माध्यमातून तक्रारदारांशी सौहार्दपूर्ण संवाद साधण्याचे आदेश पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून, दर्जाहीन वर्तणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. या पद्धतीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. तक्रार प्रक्रियेतील सुधारांमुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाची गती देखील वाढली आहे आणि तक्रार करताना होणारा विलंबही कमी झाला आहे.

गोव्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून आतापर्यंत नागरिकांना अंदाजे १०० कोटी रुपयांचा फटका बसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही फक्त अधिकृत आकडेवारी असून वास्तविक रक्कम याहून अधिक असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारच्या फसवणुकांमधून नागरिकांना सुमारे १०१ कोटी रुपये गमवावे लागले होते. गोवा पोलिसांचे हे नवोन्मेषी पाऊल तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिक-अनुकूल व जलद सेवा प्रदान करण्याकडे घेतलेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com