

Meghnath Krishna Mayekar| ICN UAE Dubai: गोव्यातील वास्को द गामा येथील रहिवासी मेघनाथ कृष्णा मयेकर यानेदुबईत १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ICN UAE (International Cultural Network) स्पर्धेत दोन रौप्य पदके जिंकून भारताला आणि गोव्याला मोठा मान मिळवून दिला आहे.
मेघनाथ मयेकर याने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अत्यंत समर्पण आणि उत्कृष्ट शारीरिक क्षमतेचे प्रदर्शन केले. त्यांनी दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दुसरे स्थान पटकावले, मयेकर याने मेन्स फिटनेस फर्स्ट टाइमर या स्पर्धेमध्ये रौप्य पदक तर मेन्स फिटनेस ओपन कॅटेगरीमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने त्याचे उत्कृष्ट शारीरिक बळ, शिस्त आणि प्रभावी स्टेज प्रेझेन्स सिद्ध केले आहे.
मेघनाथ याचे हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नाही, तर त्याने गोव्याला जागतिक फिटनेसच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून दिले आहे. त्याचे यश संपूर्ण देशातील महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरलेय. कठोर परिश्रम आणि जिद्द आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देते, हे त्याने सिद्ध केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.