Monsoon Travel Trip Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Travel Trip: पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? मग डेंग्यू-टायफॉइडपासून दूर राहण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

जर तुम्ही पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Monsoon Travel Tips: पावसाळ्यात प्रवास करायला सर्वांनाच आवडते. कारण पावसाळ्यात फिरण्याची मज्जाच वेगळी असते. म्हणूनच या दिवसांत अनेकजण कुटुंब आणि मित्रांसोबत प्रवास करण्याचा विचार करतात. तुम्हीही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर सहलीला मजेशीर बनवण्यासाठी तुमचे आरोग्य निरोगी असणे गरजेचे आहे.

कारण प्रवासात तब्येत बिघडली तर सगळी मजाच चालली जाईल. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, टायफॉइड यासारखे आजार झपाट्याने पसरतात. अशावेळी तुम्ही घरी असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही मौजमजेसाठी बाहेर जात असाल तर पावसात भिजल्याने आजारी पडू शकता.

पावसात फिरायला गेल्यास आरोग्याची अशी घ्या काळजी

  • पुरेशी झोप घ्यावी

जर तुम्ही प्रवासाला गेलात आणि बराच वेळ झोपलात तर ते चांगले नाही. पण झोप पुरेशी घ्यावी. म्हणूनच 7-8 तासांची पुरेशी झोप घ्यावी. अपूर्ण झोपेमुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि संपूर्ण प्रवास खराब होऊ शकतो

  • कपड्यांना प्रेस करावे

आपण प्रवासाला जातो तेव्हा मोजकेच कपडे सोबत घेतो. आता पावसाळा असल्याने कपडेही भिजतात. त्यामुळे असे झाल्यास ओले कपडे इस्त्री करून वाळवा. ओल्या कपड्यांमध्ये राहिल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो.

  • स्वच्छ पाणी प्यावे

पावसाळ्यात ट्रिपला जातांना स्वच्छ पाणी मिळणे अवघड असते. म्हणूनच प्रवासात नेहमी स्वच्छ पाण्याची बाटली सोबत ठेवावी. सोबत ठेवलेले पाणी संपले तर कोमट पाणी प्यावे.यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहिल.

  • जंक फूडपासून दूर राहा

पावसाळ्यात ट्रिपवर गेल्यावर स्ट्रीट फूड आणि जंक फूड खाणे टाळावे. हे पदार्थं पाहून तोंडाला पाणी नक्कीच सुटते, पण या लोभापासून वाचलात तर प्रवासही सुखकर होईल. रस्त्यावरील खाद्यपदार्थांमुळे पावसाळ्यात जिवाणूजन्य आजार होऊ शकतात, ते खाणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT