Morning Tips: सकाळी झोपेतुन उठताच मोबाईल चेक करण्याची सवय ठरू शकते घातक

मोबाईलमधून अनेक रेडिएशन बाहेर पडतं ज्यामुळे कॅन्सरसह अनेक घातक आजार होतात.
Morning Tips
Morning TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Morning Tips: डिझिटल युगात मोबाईल हा आयुष्याचा अत्यावश्यक भाग बनला आहे. प्रत्येकजण ते सर्वत्र सोबत घेऊन जातात. अनेक लोक वॉशरूमला देखील फोनशिवाय जात नाहीत. जेवताना, झोपताना, आंघोळ करताना, फिरत असताना फोन ही लोकांची गरज बनली आहे. 

यामुळेच बहुतेक लोक मानसिक आरोग्याबाबत चिंतित असतात. सकाळी उठल्यावर बरेच लोक पहिले काम करतात ते म्हणजे त्यांचा मोबाईल चेक करणे. असे काही आहेत जे सकाळी उठतात आणि बेडवर तासंतास मोबाईल वापरतात. तुम्हीही असेच करत असाल तर तुमची ही सवय सुधारण्याची वेळ आली आहे. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही.

आजकाल लोक फोन जवळ किंवा उशीवर ठेवून झोपतात. यामुळे खूप नुकसान होते. कारण मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडतात. ज्यामुळे कॅन्सरसह अनेक घातक आजार होतात. 

सकाळी झोपोतून उठल्यावर मोबाईल वापरू नये

  • तणाव वाढतो

8-9 तासांची झोप घेतल्यानंतरही अनेकांना सकाळी तणाव जाणवतो आणि त्यांच्यासोबत असे का होत आहे असा प्रश्न पडतो. खरंतर यामागे तुमचा फोन आहे. जेव्हा तुम्ही सकाळी फोन उघडता तेव्हा त्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या तुम्हाला चिंता किंवा तणावात टाकतात. यामुळे, नकारात्मकता वाढू लागते, ज्यामुळे तुम्हाला तणाव जाणवतो.

  • प्रोडक्टिविटी कमी होणे

फ्रेश असूनही काम करावेसे वाटत नाही, असे तुम्हाला अनेकदा वाटले असेल. तुम्हाला अॅक्टिव वाटत नाही आणि आणखी उत्पादकता कमी होऊ लागते. सकाळी उठून फोन वापरल्यामुळे कुठेतरी असे घडते. कारण तुमची अर्धी ऊर्जा त्यात जाते.

Morning Tips
Healthy Tips: तुम्हीही घाईघाईत जेवताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
  • मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम

जेव्हा तुम्ही सकाळी उठून फोन ओपन करता तेव्हा अनेक वेळा तुम्हाला काही नकारात्मक आणि द्वेषपूर्ण संदेश वाचायला मिळतात, ज्यामुळे तुमचा मूड खराब होतो आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

  • डोकेदुखी

ही समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. सकाळी उठून तासंतास फोन वापरल्याने डोकेदुखी आणि जडपणा येऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com